Bigg Boss Marathi Fame Actor saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

Bigg Boss Marathi Fame Actor kelvan Video : 'बिग बॉस मराठी' मधून लोकप्रियता मिळालेला अभिनेता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अभिनेत्याचे नुकतेच थाटामाटात केळवण पार पडले.

Shreya Maskar

सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा आणखी एक कलाकार लग्न बंधनात अडकणार आहे.

मराठी अभिनेत्याचे नुकतेच केळवण पार पडले आहे.

काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली.

सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सूरज चव्हाण, पूजा बिरारी-सोहम बांदेकर, प्राजक्ता गायकवाड, तेजस्विनी लोणारी हे सर्व कलाकार लग्न बंधानात अडकले आहेत. आता यांच्याच पाठोपाठ बिग बॉस मराठी फेम अभिनेता जय दुधाणे देखील लवकरच बोहल्यावर चढणार आहे. नुकतेच त्याचे केळवण पार पडले आहे.

लालबाग, ठाणे येथील 'माजघर'मध्ये थाटामाटात जय दुधाणेचा केळवण कार्यक्रम पार पडला. व्हिडीओमध्ये आपल्याला सुंदर डेकोरेशन पाहायला मिळत आहे. केळीच्या पानावर 'जयचं केळवण' लिहिलेले दिसत आहे. मराठमोळ्या पद्धतीने जयचे केळवण पार पडले. त्याचे औक्षण करण्यात आले. जयच्या कुटुंबाने हा सुंदर केळवण कार्यक्रम आयोजित केला होता. जयच्या समोर पंचपक्वानांचे ताट पाहायला मिळत आहे. केळवण कार्यक्रमात जय खूपच खुश दिसत आहे.

जय दुधाणे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर हर्षला पाटीलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. ही दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मार्च महिन्यात जयने मसुरी येथे हर्षला प्रपोज केले होते आणि आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

वर्कफ्रंट

जय दुधाणेने अनेक रिअ‍ॅलिटी शो मध्ये भाग घेतला आहे. तो 'बिग बॉस मराठी 3' मध्ये झळकला. तसेच जय दुधाणे Splitsvilla 13 चा विजेता देखील ठरला आहे. तर 'बिग बॉस मराठी 3' तो उपविजेता ठरला. तसेच त्याने 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत काम केले आहे. चाहते आता त्याच्या लग्नाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT