Kiran Mane Special Post Facebook
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Special Post: ‘दसऱ्याच्या आधीच माझा सोन्याचा दिवस…’, किरण मानेंनी शेअर केली चाहत्यांसाठी खास पोस्ट…

Kiran Mane News: किरण मानेंनी दसऱ्यानिमित्त भेटायला आलेल्या तृतीयपंथीयांबद्दल खास पोस्ट शेअर केलीय.

Chetan Bodke

Kiran Mane Special Post Shared Social Media

‘बिग बॉस’ फेम अभिनेते किरण मानेंची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते. कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत राहिलेल्या किरण मानेंचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. अशातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांनी केलेले कौतुक पाहून किरण माने यांचे डोळे पाणावले. किरण मानेंनी दसऱ्याला त्यांना भेटायला आलेल्या तृतीयपंथीयांबद्दल खास पोस्ट शेअर केलीय.

किरण मानेंनी त्यांना भेटायला आलेल्या तृतीयपंथीयांसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. आपल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “...आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या अनोख्या चाहत्यांनी दसर्‍याच्या आदल्या दिवशीच माझा दिवस सोन्याचा केला ! काल अचानक काही तृतीयपंथी लोक अत्यंत प्रेमानं, आवर्जुन, खास माझा पत्ता शोधत मला भेटायला आले. मला पाहून भारावून बोलू लागले, “किरणजी,तुमच्या भुमिका आमच्या काळजात कोरल्यात आम्ही. विलास पाटील आणि सिंधुताईंचे वडील पाहिल्यानंतर कायम वाटायचं असा बाप आम्हाला लाभायला पाहिजे होता. मलाही चिंधीसारखीच शिकायची आवड होती. बिगबाॅसमध्ये असताना तुम्हाला खूप व्होटिंग केलं आम्ही....” ऐकताना माझे डोळे पाणावत होते.” (Social Media)

“खास माझ्यासाठी जेजुरीच्या खंडोबाच्या गाण्यावर त्यांनी डान्स केला. “आम्ही वरचेवर तुम्हाला भेटायला येऊ. प्रत्येक वेळी यशाची पायरीवर चढलेली दिसणार आहे आम्हाला. तुम्ही खूप खूप मोठे व्हाल... सुपरस्टार व्हाल. जगात नाव होईल. आमचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.” असं म्हणून लाखमोलाचा आशिर्वाद देऊन गेले... बाकी कायबी असो भावांनो, ही अशी माया लई कमीजणांना लाभते. फॅन्सच्या 'लाईव्ह' प्रेमाबाबतीत मी लै लै म्हंजे लैच भाग्यवान हाय ! कलाकार आहे मी. जसे चाहते आहेत, तसे काही निंदक, ट्रोलही आहेत...” असं किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

“पण माझा द्वेष करणार्‍यांचा मला जरासुद्धा राग येत नाही... कारण त्यांच्यामुळेच तर माझ्या चाहत्यांच्या अफाट प्रेमाची किंमत किती मोलाची आहे, हे मला कळतंय. बहुत छोटे हैं मुझ से मेरे दुश्मन... जो मेरे चाहनेवाले हैं, मुझ से बड़े है! लब्यू...” असे किरण माने आपल्या पोस्टच्या शेवटच्या भागात म्हणाले.

दरम्यान किरण माने यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करीत आहेत. किरण माने यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, ‘कलर्स मराठी’वरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेमध्ये त्यांनी सिंधुताईंच्या वडीलांचे पात्र साकारले आहे. किरण माने साकारत असलेल्या पात्राचे नाव अभिमान साठे असे असून त्यांच्या भूमिकेचे सर्वांनीच कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT