Bigg Boss Marathi 6 Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 Video : रुचितावरच्या प्रेमाची विशालने दिली कबुली, नेटकरी म्हणतात- "वयातील अंतर तरी पाहा..."

Vishal Kotian - Ruchita Jamdar : बिग बॉसच्या घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. विशालने रुचितावरच्या प्रेमाची कबुली दिली आहे. ज्यामुळे नेटकरी त्यांना चांगले ट्रोल करत आहे.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात नॉमिनेश टास्क पार पडला आहे.

विशाल सर्वांसमोर रुचितावरच्या प्रेमाची कबुली देतो.

नेटकरी विशाल-रुचिताला त्यांच्या वयातील अंतरामुळे ट्रोल करत आहेत.

'बिग बॉस मराठी 6'मध्ये रोज एक नवीन राडा पाहायला मिळत आहे. शोमध्ये सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. अलिकडेच रुचिता अनुश्रीला सांगते की, तिला विशाल आवडतो. त्यानंतर अनुश्री हे सर्व जाणून विशालला सांगते. त्यानंतर विशाल देखील सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतो. बिग बॉसच्या घरात नॉमिनेश टास्क रंगला आहे. ज्याचे नाव 'नॉमिनेशची बादली' असे आहे.

नॉमिनेश टास्कमध्ये विशाल दिपालीला नॉमिनेट करतो. तेव्हा तो रुचितावरच्या प्रेमाची कबुली देतो. विशाल आणि रुचितामध्ये तब्बल 15 वर्षांचा फरक आहे. विशाल नेमकं काय बोलला पाहा-

  • विशाल - रुचिता विशालचे ऐकते...ऐकते...आता मी सर्वांसमोर बोलती की, मला रुचिता ती आवडते.

  • दिपाली - माझी अपेक्षा ही आहे, बिग बॉसनंतरही हे चालू ठेवावं...

  • रुचिता - ती मला नाही शिकवणार...माझी आई आहे की माझा बाप आहे...

विशालचे हे बोलणे ऐकल्यावर नेटकरी विशाल आणि रुचिताला चांगले ट्रोल करत आहेत. त्यांच्या वयात खूप अंतर आहे. एका यूजरने लिहिलं की, "वयातील अंतर तरी पाहा..." आता विशाल आणि रुचिताचे नाते हे खेळापुरता आहे की घराबाहेरही राहणार हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच रुचिता-विशालची जोडी बिग बॉसच्या घरात आणखी कोणता धुमाकूळ घालणार, यांच्या नात्यात दुरावा येणार का? हे सर्व पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

बिग बॉसच्या घरात या आधी दोन जोड्या पाहायला मिळाल्या. पहिली तन्वी कोलते-आयुष्य संजीव आणि दुसरी करण सोनावणे -प्राजक्ता शुक्रे... करण प्राजक्ताकडे आपल्या प्रेमाची कबुली देतो. मात्र आयुष्य आणि करणच्या शोमधून जाण्याने या दोन्ही लव्ह स्टोरी अपूर्ण राहिली. आता येणाऱ्या काळात घराच्या बाहेर काय होते, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT