O'Romeo vs Tu Yaa Main : शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' फ्लॉप की हिट? तर 'तू या मैं' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला

O'Romeo vs Tu Yaa Main Box Office Collection Day 4 : शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' आणि शनाया कपूरचा 'तू या मैं' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपटांनी सोमवारी किती कमाई केली, जाणून घेऊयात.
O'Romeo vs Tu Yaa Main Box Office Collection Day 4
O'Romeo vs Tu Yaa Main saam tv
Published On
Summary

'ओ रोमियो' आणि 'तू या मैं' चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 ला रिलीज झाला.

'ओ रोमियो'मध्ये शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी एकत्र झळकले आहेत.

'तू या मैं'मध्ये शनाया कपूर आणि आदर्श गौरव यांची जोडी पाहायला मिळत आहे.

13 फेब्रुवारी 2026 ला बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट रिलीज झाले. शाहिद कपूर- तृप्ती डिमरीचा 'ओ रोमियो' आणि शनाया कपूर-आदर्श गौरव यांचा 'तू या मैं' चित्रपट. 'ओ रोमियो'ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर 'तू या मैं'च्या कमाईत दिवसेंदिवस घसरण पाहायला मिळत आहे. 'तू या मैं' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. तर 'ओ रोमियो' चित्रपट अ‍ॅक्शन-थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपट आहे. सोमवारी दोन्ही चित्रपटाने कितीचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'ओ रोमियो' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'ओ रोमियो' चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 4.75 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाची एकूण कमाई 34.90 कोटी रुपये झाली आहे. लवकरच 'ओ रोमियो' चित्रपट 50 कोटींचा टप्पा गाठेल.

  • पहिला दिवस - 8.50 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 12.65 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 9.00 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 4.75 कोटी रुपये

  • एकूण - 34.90 कोटी रुपये

'तू या मैं' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'तू या मैं' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. चित्रपटाने सोमवारी चौथ्या दिवशी 35 लाख रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळे चित्रपटाचे एकूण व्यवसाय 3.2 कोटी रुपयांचा झाला आहे.

  • पहिला दिवस - 6 लाख रुपये

  • दुसरा दिवस - 1.45 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 8 लाख रुपये

  • चौथा दिवस - 35 लाख रुपये

  • एकूण - 3.2 कोटी रुपये

'ओ रोमिओ' VS 'तू या मैं'

'ओ रोमियो' चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरीसोबतच नाना पाटेकर , रणदीप हुडा , दिशा पटानी हे कलाकार देखील झळकले आहेत. 'ओ रोमियो' चे निर्माते विशाल भारद्वाज आहेत. मीडिया रिपोर्टनुसार,'ओ रोमियो' चित्रपटाचे बजेट जवळपास 120-150 कोटी रुपये आहे. 'तू या मैं' हा चित्रपट बिजॉय नांबियार यांनी दिग्दर्शित केला आहे. शनाया कपूर आणि आदर्श गौरव यांचा 'तू या मैं' चित्रपट रिलेशनशिप ड्रामापासून सुरू होतो. त्यात जगण्याच्या थ्रिलर अनुभवायला मिळतो.

O'Romeo vs Tu Yaa Main Box Office Collection Day 4
Ameesha Patel : अमिषा पटेल अडचणीत; आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com