Bigg Boss Marathi 6 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातून सर्वात स्ट्राँग स्पर्धक पडणार बाहेर? 'त्या' एका चुकीने गेम पलटला, नाव वाचून बसेल धक्का

Bigg Boss Marathi 6 Elimination : 'बिग बॉस मराठी ६' चा खेळ शेवटच्या टप्प्यावर आला आहे. या आठवड्यात घरातील सर्वात स्ट्राँग स्पर्धक बाहेर पडणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात तन्वी कोलते पहिली फायनलिस्ट बनली आहे.

घरातील पाच सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत.

बिग बॉसच्या घरातून सर्वात स्ट्राँग स्पर्धक बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

'बिग बॉस मराठी ६' चा आता १३ वा आठवडा सुरू आहे. रितेश भाऊ होस्ट करत असलेला हा शो आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. सर्वजण 'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकताच घरात तिकीट टू फिनाले टास्क रंगला. यात राकेश बापट आणि अनुश्री मानेला मागे टाकून तन्वी कोलते पहिली फायनलिस्ट बनली आहे. तिला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.

तन्वी कोलते थेट फायनलला गेल्यामुळे ती या आठवड्यात सेफ आहे. तर रेवा कौरासे या आठवड्याची कॅप्टन असल्यामुळे ती देखील सेफ आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी ५ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

  • राकेश बापट

  • अनुश्री माने

  • विशाल कोटियन

  • दिपाली सय्यद

  • राखी सावंत

बिग बॉसच्या या आठवड्यात विशाल कोटियन आणि राखी सावंत यांपैकी एक स्पर्धक बाहेर जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. राखी सावंत या घरात एक वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती. तिने घरात आल्यापासून सर्वांशी भांडताना दिसत आहे. या आठवड्यात राखी तन्वी आणि विशालच्या मागे लागलेली पाहायला मिळाली. तसेच गेल्या आठवड्यात विशाल आणि राकेशमध्ये तुफान राडा होता. ज्यात दोघेही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका-टिपणी करतात. यामुळे राकेश बापटला एका आठवड्यासाठी आणि विशाल कोटियनला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट केले जाते.

आता शेवटच्या टप्प्यावर येऊन कोण घराचा निरोप घेणार हे शनिवार-रविवारी भाऊच्या धक्क्यावर समजेल. अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा झाली नाही. रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच या आठवड्यात तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद यांच्यातही वाद होतात. तन्वीमुळे दिपाली खूप दुःखावते.'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT