Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : शॉकिंग Eviction! बिग बॉसच्या घरातून 'या' सदस्याचा पत्ता कट? चाहत्यांना मोठा धक्का

Bigg Boss Marathi 6-Elimination : बिग बॉसच्या घरात आज दुसरे एलिमिनेशन पार पडणार आहे. बिग बॉसच्या घरातून ड्रामा क्वीनचा पत्ता कट होणार आहे. नेमकं घराबाहेर कोण जाणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावर प्रभूला चांगले खडेबोल सुनावले.

तिसऱ्या आठवड्यात आठ सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

बिग बॉसच्या घरातून ड्रामा क्वीनचा पत्ता कट झाला असल्याचे बोले जात आहे.

बिग बॉसच्या घरात आज (रविवारी 1-2-2026) भाऊचा धक्का गाजणार आहे. रितेश भाऊंनी घरातील सदस्यांची त्यांच्या आठवड्याभराच्या वागणुकीवरून चांगलीच शाळा घेतली आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात नृत्यांगना राधा पाटीलने घराचा निरोप घेतला. आता या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एकूण 8 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यांची यादी खालील प्रमाणे-

बिग बॉसच्या घरातून कोण गेले बाहेर?

बिग बॉसची माहिती देणाऱ्या अकाऊंटवरून असे बोले जात आहे की, तिसऱ्या आठवड्यात सोनाली राऊतने बिग बॉसच्या घराला रामराम ठोकला आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉस सुरू झाल्यापासून सोनालीने आपल्या ड्रामाने प्रेक्षकांना खूप हसवले आहे. बिग बॉसच्या घरात सोनाली ग्लॅमरचा तडका होती. मीडिया रिपोर्टनुसार, कमी मतांमुळे सोनाली राऊतला घराबाहेर जावे लागले.

एक चूक पडली महागात

'शेणाचं दार अन् मेणाचं दार' हा कॅप्टन्सी टास्क सोनाली राऊत खेळली नाही. त्यामुळे बिग बॉसने तिला पुढच्या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट केले. या मुद्द्यावरून रितेश भाऊ सोनालीला मागील भाऊच्या धक्क्यावर चांगले सुनावले होते. रितेश भाऊ सोनालीला म्हणतात की, "सोनाली तुम्ही ठरवलं, की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही नाही उभ्या राहणार... मग, तुम्ही आलात कशाला येथे? टास्क खेळायला आलात ना तुम्ही..." त्यावर सोनाली म्हणते की, "पण मला जे वाटलं..." इतक्यात रितेश भाऊ सोनालीला थांबवत म्हणतो की, "ओ एक मिनिट, हा Attitude ना तुमच्या घरी ठेवायचा. या घरात नाही...इथे सगळे सारखे आहेत. यावेळी नॉमिनेट केलंय... पुढच्या वेळेस घराच्या बाहेर काढेन..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train: 'मेड इन इंडिया' बुलेट ट्रेन लवकरच धावणार, तिकिटाबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर, वाचा सविस्तर

Instagram युजर्सच्या कामाची बातमी! आता चॅट्सची प्रायव्हसी संपणार, मेटानं घेतला मोठा निर्णय

Pudina Storing Tips: पुदीना महिनाभर फ्रेश राहण्यासाठी काय करावे?

Viral Video: ऑटोवाला दिवसाला ७५ हजार कमावतो? त्या व्हायरल व्हिडिओनंतर सर्वांनाच बसला धक्का, पण नेमकं सत्य काय?

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याचा ग्लो गेलाय? मग आठवड्यातून २ वेळा नक्की वापरा 'हा' फेसमास्क

SCROLL FOR NEXT