Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात चोरीचा मामला; सदस्य एकमेकांवर करतात आरोप-प्रत्यारोप, यामागे नेमका कोणाचा हात? VIDEO

Theft In Bigg Boss Marathi 6 House : बिग बॉसच्या घरात चोरी झाली आहे. त्यामुळे घरात सदस्य एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. घरातील नेमका चोर कोण? जाणून घेऊयात.

Shreya Maskar

पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

घरात चोरी झाल्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदस्य एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी 6' मराठी सुरू होईन आता 4-5 दिवस झाले आहेत. मात्र सदस्यांनी एवढ्यातच घरात राडा, हाणामारी , तुफान भांडणे केली आहेत. बिग बॉसचा गेम दिवसेंदिवस अधिक रंगत जात आहे. अशात आता 'बिग बॉस मराठी'च्या घरात खळबळ माजली आहे. घरामध्ये चक्क एक मोठी 'चोरी' झाल्याचे समोर आले आहे. बिग बॉसने याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे चाहते देखील बिग बॉसच्या घरातील चोर कोण, जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

'बिग बॉस मराठी 6'च्या घरात झालेल्या चोरीमागे नेमका कोणाचा हात? यावरून आता घरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य या चोरीबद्दल एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काही स्पर्धक याला 'वृत्ती' म्हणत आहेत, तर काही जण त्या व्यक्तीला उघड पाडण्याची मागणी करत आहेत. सागर कारंडे बोलतो की,  "घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की तो माणूस कोण आहे..."

चोरीच्या प्रकरणामुळे घरातील समीकरणे बदलणार का? बिग बॉस यावर काय शिक्षा देणार? तसेच रितेश भाऊ यावर आपले कसे मत मांडणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'चोरीचा मामला' नेमका काय? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.

नॉमिनेट सदस्य

नॉमिनेशच्या पतंग कापण्याच्या टास्कमध्ये एकूण नऊ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात दिपाली सय्यद, करण सोनवणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, सागर कारंडे, रोशन भजनकर, दिव्या शिंदे आणि राधा पाटील यांचा समावेश आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यातला पहिला निकाल भाजपच्या बाजूने, भाजपचे ३ उमेदवार विजयी

EPF आणि NPS च्या नियमात १० महत्त्वाचे बदल; थेट रिटायरमेंट फंडवर होणार परिणाम; वाचा अपडेट

Municipal Election Result: कुंभमेळानगरी नाशिकमध्ये काय सांगता सुरुवातीचे आकडे? मनसेच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलणार की धनुष्यबाण चालणार? VIDEO

Mahanagar Palika Election Result : ठाकरे बंधूंची गाडी सुसाट, मुंबईत ६० जागांवर आघाडीवर, राज्यात भाजप सुसाट, वाचा सुरूवातीचे कल

Municipal Elections Result: मतमोजणीवेळी राडा, EVM मशीनचे सील फुटल्याचा आरोप, कुठे घडली घटना?

SCROLL FOR NEXT