Bigg Boss Marathi 6 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : विजेतेपदाच्या शर्यतीतून 'हा' दावेदार बाहेर; बिग बॉसमध्ये शॉकिंग एलिमिनेशन, नाव वाचताच बसेल मोठा धक्का

Bigg Boss Marathi 6 Elimination : बिग बॉसच्या घरातून आज एक सदस्य बाहेर जाणार आहे. बाहेर जाणाऱ्या सदस्याचे नाव समोर आले आहे. जे वाचून तुम्हाला मोठा धक्का बसेल. सदस्याला आपली एक चूक खूपच महागात पडली.

Shreya Maskar

रितेश देशमुख भाऊच्या धक्क्यावर सचिन कुमावतवर भडकला.

या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

घरात प्राजक्ता आणि राखीमध्ये मोठा वाद होतो.

'बिग बॉस मराठी 6' गेले दोन आठवडे राखी सावंत गाजवत आहे. रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. काल भाऊचा धक्का पार पडला रितेश भाऊंनी घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. काहींचे कौतुक देखील केले. आज रविवार आहे. आज घरातून एक सदस्य बाहेर पडणार आहे. त्यामुळे प्रेक्षक तो सदस्य कोण असेल हे जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक दिसत आहेत. या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये सदस्यांचा राडा पाहायला मिळाला.

या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी 'बिग बॉस मराठी 6' च्या घरातून 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यांची यादी जाणून घेऊयात.

  1. प्रभू शेळके

  2. प्राजक्ता शुक्रे

  3. दीपाली सय्यद

  4. रुचिता जामदार

  5. राकेश बापट

  6. सचिन कुमावत

  7. अनुश्री माने

  8. रोशन भजनकर

  9. सागर कारंडे

कोण जाणार घराबाहेर?

सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी 6'ची माहिती देणारी अनेक चॅनेल, अकाउंट आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होटिंग ट्रेंडमध्ये सर्वाधिक मते रोशन भजनकर आणि राकेश बापट यांना मिळाली आहेत. प्रेक्षक यांच्यावर भरभरून प्रेम करत आहेत. तर या आठवड्यात गायक सचिन कुमावत यांना कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, या आठवड्यात सचिन कुमावत घराचा निरोप घेणार आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

सचिन बाहेर गेल्यावर सर्वात जास्त दुःख प्राजक्ताला होईल. कारण करण, आयुष, सचिन, प्राजक्ता यांचा एक ग्रुप होता. करण आणि आयुष आधीच बाहेर गेले आहे आणि आता सचिन देखील गेल्यावर प्राजक्ता शुक्रे एकटी पडेल. त्यामुळे प्राजक्ताचा नवीन गेम प्लान काय असणार पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच आज होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावरच एलिमिनेट सदस्याचे नाव अधिकृतरित्या जाहीर होईल.  'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहायला मिळणार आहे.

रितेश भाऊंनी सचिन कुमावतची घेतली शाळा

कालच्या भाऊच्या धक्क्यावर पहिल्यांदाच रितेश भाऊ गायक सचिन कुमावतवर भडकले. सचिनने राखीच्या तोंडावर पाणी आणि पीठ फेकल्यामुले रितेश भाऊंनी त्याला जाब विचारला. रितेश भाऊ म्हणाले की, "तुम्ही एका महिलेच्या चेहऱ्यावरती पाणी कसे फेकू शकता? तुम्ही इथे सचिन भाऊ म्हणून वावरता ना? मग काय तुमचा आदर राहणार आहे? मला हे खूप खटकले..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्वामी समर्थांच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला! शिर्डीहून अक्कलकोटला जात असताना भीषण अपघातात 5 महिन्यांच्या चिमूरडीचा मृत्यू

Maharashtra News Live Update : मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक गोष्टी केल्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summer Waterfall In Mumbai:भर उन्हाळ्यात मुंबईत वाहतोय पांढराशुभ्र धबधबा! पर्यटकांची तुफान गर्दी, पाहा कुठे आहे हे ठिकाण?

Chanakya Niti: समोर मित्र, पण पाठीमागे शत्रू? या ५ चिन्हांवरून ओळखा लोकांचा खरा चेहरा

Shocking : धक्कादायक! हॉटेलच्या बंद खोलीत तरुणी आणि पुरुष नको त्या अवस्थेत, पोलिसांनी छापा टाकताच भयंकर सत्य आलं समोर

SCROLL FOR NEXT