Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : टोळीत फूट! रुचिताने थेट 'या' सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6-Second Week Captaincy Task : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगला आहे. घरात मैत्रीत फूट पडली आहे. बिग बॉसच्या घरात दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क रंगला.

कॅप्टन्सी टास्कमुळे मैत्रीच्या नात्यात फूट पडते.

कॅप्टन्सी टास्कमध्ये शेणाचं आणि मेणाचं दार दाखवण्यात आले.

बिग बॉसच्या घरात आता नवीन दुसरा आठवडा सुरू झाला आहे. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे. ज्याचा भन्नाट प्रोमो समोर आला आहे. यंदाची 'दार' ही थीम चांगली गाजत आहे. रोज नवीन दार घरातील सदस्यांसाठी धोक्याची घंटा आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये शेणाचं आणि मेणाचं दार दाखवण्यात येणार आहे. ज्यामुळे मैत्रीत फूट पडताना दिसत आहे. जो सदस्य मेणाच्या घरात जाणार त्याला कॅप्टन्सीची उमेदवारी मिळणार.

बिग बॉसने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओत रुचिताला तिच्याच मैत्रिणी शेणाच्या घरात पाठवतात. व्हिडीओत दोन त्रिकूट पाहायला मिळत आहे. पहिले - सागर कारंडे, अनुश्री माने, रोशन भजनकर आणि दुसरे- रुचिता जामदार, तन्वी कोलते, आयुष संजीव... मात्र या खेळात एक वेगळाच ट्विस्ट येतो. अनुश्री आणि राधा रुचिताच्या विरोधात उभ्या राहतात. रुचिताला त्या शेणाच्या घरात पाठवतात. या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.

मैत्रिणींनी धोका दिल्यामुळे रुचिता चांगली संतापते. त्यानंतर ती तन्वीला रागात शेणाच्या घरात पाठवते. आता तन्वी आणि रुचिता दोघीनी कॅप्टन्सीच्या स्पर्धेतून बाहेर पडतात. आता तन्वी आणि रुचितामध्ये देखील वाद होण्याची शक्यता आहे. मात्र आता कोण बिग बॉसच्या घराचा कॅप्टन होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.

तसेच बिग बॉसच्या घरात सध्या दिव्या विरूद्ध सर्व घरातले पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र बसलेले असतात. यावेळी काही सदस्यांनी दिव्यावर थेट निशाणा साधला आहे. अनुश्री म्हणते की, "दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही," तर दुसरीकडे रुचिता बोलते, "कॅप्टन असा असावा ज्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे नीट ऐकून घेतले पाहिजे..." त्यात सुमित आणि सागर यांचे म्हणणे पडले. "दिव्या mature नाहीये अजून, अनुभवाच्या जोरावर दिव्या इतरांपेक्षा थोडी कमी पडते..." यावर दिव्या म्हणते, "अनुभव जन्मतः कोणालाच नसतो. जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते!"

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मध्यरात्री बेडवर बायकोसोबत ३ तरुण, नवरा कामावरून घरी आला अन्...; दुसऱ्या दिवशी खोलीत दिसले भयंकर दृश्य

OTT Subscription: फक्त 79 रुपयांमध्ये पाहा महिनाभर JioHostar, स्वस्तात मस्त सब्सक्रिप्शन प्लान; वाचा सविस्तर

Railwayचं भन्नाट फीचर; PNR नंबर ते लोकेशन, फक्त एका SMSनं तुम्हाला कळेल रेल्वेची संपूर्ण कुंडली

Maharashtra Live News Update: भाजपचे नगरसेवक काँग्रेस नगरसेवकांच्या संपर्कात? मुनगंटीवारांनी घेतली फिरकी

Tikli Design: टिकलीचे 5 स्टायलिश प्रकार, कोणत्याही साडीवर भारीच दिसेल

SCROLL FOR NEXT