Bigg Boss Marathi 6  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : करण सोनावणेच्या घराबाहेर जाण्याने प्राजक्ता भावुक, घट्ट मिठी मारली अन्..., पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 - Double Eviction : 'बिग बॉस मराठी 6' मधून दोन सदस्य बाहेर पडले आहेत. आयुष संजीवसोबत करण सोनावणे देखील एलिमिनेट झाला. करणच्या जाण्याने प्राजक्ता शुक्रेला खूप वाईट वाटले.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 6' मधून दोन सदस्यांची एक्झिट झाली आहे.

करण सोनावणेच्या घराबाहेर जाण्याने प्राजक्ता शुक्रे खूपच भावुक होते.

करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रे यांची घरात चांगली मैत्री पाहायला मिळाली.

'बिग बॉस मराठी 6' मध्ये गेल्या आठवड्यात 6 सदस्य नॉमिनेट होते. यात प्रभू शेळके, सचिन कुमावत, प्राजक्ता शुक्रे, राकेश बापट, आयुष संजीव आणि करण सोनावणे यांचा सहभाग होता. भाऊच्या धक्क्यावर डबल एविक्शन होते आणि घरातील दोन सदस्य बाहेर पडतात. ज्यामुळे प्रेक्षक, घरातील इतर सदस्यांना मोठा धक्का बसतो. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि 'जिओहॉटस्टार'वर पाहता येतो.

बिग बॉसच्या घरात Double Eviction

काल म्हणजे रविवारी भाऊचा धक्का पार पडला. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून दोन सदस्य बाहेर गेले. पहिला आयुष्य संजीव आणि दुसरा करण सोनावणे... गेल्या आठवड्यात आयुष्य संजीव कुठेच दिसला नव्हता. तो खेळातही नाही आणि कोणत्या भांडणातही नव्हता. त्यामुळे तो घराबाहेर जाणार अशा चर्चा आधीपासून सुरू होती. मात्र करण सोनावणेच्या एक्झिटने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. करण सोनावणे सुरुवातीपासून खेळात खूप सक्रिय होता. त्याच्या कॉमेडी शैलीने तो कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करायचा. ज्यामुळे प्रेक्षक करण सोनावणेच्या एक्झिटने खूपच नाराज झाले आहेत.

प्राजक्ता शुक्रेला अश्रू अनावर

'बिग बॉस मराठी 6' सुरू होऊन एक महिना झाला आहे. खेळाच्या सुरुवातीपासून प्राजक्ता शुक्रे आणि करण सोनावणे यांची चांगली मैत्री पाहायला मिळाले. दोघे एकत्र खेळाचे, खूप गप्पा मारायचे. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. जेव्हा राकेश प्राजक्ताला लग्नाची मागणी घालतो तेव्हा प्राजक्ता ते सर्व आधी करणला जाऊन सांगते. घराबाहेर जाण्याआधी प्राजक्ता करणला मिठी मारते. तिच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळतात. ती खूप भावुक होते. आता करणच्या जाण्याने प्राजक्ताचा नवीन गेम प्लान काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बिग बॉसच्या घरातून आतापर्यंत कोण कोण गेले?

  • सोनाली राऊत

  • आयुष्य संजीव

  • करण सोनावणे

  • राधा पाटील

  • दिव्या शिंदे

  • ओमकार राऊत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT