Bigg Boss Marathi 6 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: "तू इथे पदर पकडायला आला नाहीस!" राखीच्या नव्या चालीमुळे तन्वी-प्रभूमध्ये वादाची ठिणगी?

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी ६'च्या नव्या प्रोमोमध्ये तन्वी कोलते आणि प्रभू शेळके यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळतो. राखी सावंतच्या खेळीमुळे घरातील समीकरणे कशी बदलली?

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6:बिग बॉस मराठी ६’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या नव्या प्रोमोमध्ये घरातील संबंध, रणनीती आणि तणावाचे वातावरण वाढले आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या प्रोमोमध्ये तन्वी कोलते आणि प्रभू शेळके यांच्यातील मतभेद होत असल्याचे दिसते. या दोघांची मैत्री सुरुवातीला मजबूत असली तरी आता राखी सावंतमुळे दोघांमध्ये मोाठ्या प्रमाणात भांडण होणार असल्याचं नवीन प्रोमोमध्ये दिसते.

प्रोमोमध्ये दाखवलं आहे, किचनच्या परिसरात स्पर्धकांचा गोंधळ सुरु असल्याचे दिसते. राखी सावंत प्रभूला बोलते 'तू इथे पदर पकडायला आला नाहीस तू खेळात आणखी जबाबदारी घे स्मार्टनेस दाखव. त्यावर तन्वी 'ही काहीही बोलते' असे म्हणत राखीचा विरोध करते. त्यानंतर प्रभूला वाईट वाटत म्हणून राखीत्याला मिठी मारते आणि प्रभूला रडू येत.

यानंतर तन्वी स्पष्टपणे प्रभूला सांगते, 'उद्यापासून माझा पदर पकडू नकोस'. प्रभू यानंतर रडताना आणि उदास झालेला दिसतो. राखी सावंत त्यानंतर म्हणते की 'त्याने तन्वीला कॅप्टन बनवलं आहे आणि त्याचा काही स्पर्धक आता स्वत:साठी वापर करत आहेत.' प्रोमोच्या शेवटी प्रभू आणि तन्वी यांच्यातील मतभेद अधिक वाढल्याचे दिसून येते.

सोशल मीडियावर या प्रोमोला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, नेटिझन्स राखीच्या रणनीती आणि घरातील सदस्यांचे बदलते नाते यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'राखी प्रत्येकाचे डोळे उघडत आहे.' आणखी एकाने लिहिले, 'राखी काट्यात राहून काट्यांचा काटा काढते', तर एकाने लिहीलं,'राखी टोळीला नडत होती' आता येत्या भागात वाद का झाला आणि राखीचं जबाबदार आहे का हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT