Bigg Boss Marathi 6  saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6 : "तोंड शेणात घाल..."; बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी तन्वी कोलते अन् रुचिता जामदार यांच्यात राडा; पाहा VIDEO

BB Marathi 6 : Ruchita -Tanvi Fight : बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी राडा पाहायला मिळत आहे. घरात तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यात तुफान भांडणे झाली आहेत.

Shreya Maskar

रितेश देशमुख होस्ट करत असलेला शो 'बिग बॉस मराठी 6'सुरू झाला आहे.

पहिल्याच दिवशी बिग बॉसने घराचे दार सदस्यांसाठी बंद केले.

घरात तन्वी कोलते आणि रुचिता जामदार यांच्यात मोठे भांडण होते.

'बिग बॉस मराठी ६' ला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी बिग बॉसने घरातील सदस्यांना घरा बाहेर काढून घराचे दार बंद केले. ज्यामुळे सदस्यांची चांगली तारांबळ उडाली. आता बिग बॉसने नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात घरातील सदस्य भांडताना दिसत आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

बिग बॉसच्या घरात पहिले भांडण झाले आहेत. रुचिता जामदार आणि करण सोनवणे यांच्यात मोठा वाद होतो. ज्याचा प्रोमो बिग बॉसने शेअर केला आहे. ज्याला त्यांनी एक खास कॅप्शन दिलं आहे. लिहिलं की, "पहिल्याच दिवशी रंगणार तन्वी आणि रुचिता यांच्यामध्ये वाद..." या व्हिडीओवर प्रेक्षकांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. बिग बॉसचा खेळ हळूहळू रंगताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुचिता जामदार आणि करण सोनवणे एकमेकांशी बोलत असतात. करण रुचिताला म्हणतो की, आपण स्विमिंग पुलमध्ये जातो तेव्हा थोडं पाणी पितोच ना...मग तुम्ही फालतूमध्ये..." त्यानंतर तो घाबरल्याचा अभिनय करतो. जे पाहून रुचिता हसते. हे पाहिल्यावर तन्वी तिथे येते आणि म्हणते की, फालतूमध्ये म्हणू नकोस...त्यावर रुचिता म्हणते, "तुम्ही लोक ना शस्त्र घेऊन आहात... " त्यानंतर दोघीही जोरात भांडायला लागतात. तन्वी रुचिताला म्हणते की, "ती मर्यादा क्रॉस करू नकोस..." त्यावर रुचिता म्हणते, "बिनडोक, तुझं तोंड शेणात घाल..."

घरातील सदस्य दोघींचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हा वाद कोणत्या दिशेला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.'बिग बॉस मराठी ६' हा सीझन 100 दिवसांचा असणार आहे. यंदाची थीम 'दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार...' आहे. 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुलुंडमध्ये बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण

'सूर्योदय' जाहला...वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमारचं तुफान, USA समोर १६२ धावांचं टार्गेट

Shocking News: जत्रेतला पाळणा कोसळला, पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू; थरकाप उडणारा VIDEO समोर

Maharashtra ZP Election Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्येची युतीची सत्ता? एमआयएमचा रंग पडणार फिका

ZP निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष; अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर, सामचा एक्झिट पोलचा अंदाज

SCROLL FOR NEXT