Bigg Boss Marathi 6 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीमध्ये उघडणार 'ती' खोली; स्पर्धकांना मिळणार 'ही' खास पॉवर

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये 'उल्टा-पुल्टा' रूमची धमाकेदार एंट्री झाली आहे. या खास रूममुळे स्पर्धकांचा खेळ, रणनीती आणि नाती कशी बदलणार? हे पाहायला मिळणार आहे.

Shruti Vilas Kadam

Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी ६’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये आता एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हा ट्विस्ट म्हणजे ‘उल्टा-पुल्टा रूम’! ही खोली या वर्षीच्या घरात प्रथमच दिसत आहे आणि या खोलीमुळे स्पर्धेवर आणि स्पर्धकांवर कसा परिणाम पडतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

या सिझनमध्ये घराची थीम ८०० खिडक्या ९०० दारे अशी ठेवण्यात आली असून, प्रत्येक स्पर्धकला कुठले दार कधी उघडाणार हे सांगता येत नाही. अशाच अनेक दरांपैकी एक विशेष दार उघडल्यावर मिळणारी ही ‘उल्टा-पुल्टा’ खोली आहे. या रूममध्ये सगळ्या वस्तू उलट्या दिसतात आणि याचा गेमवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे कोणाचा खेळ मजबूत होईल आणि कोणाचा खेळ संपेल हे सर्व या रूमच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे!

घराची कॅप्टन प्राजक्ता या विशेष खोलीमध्ये प्रवेश करणारी पहिली स्पर्धक आहे. बिग बॉसने तिला विचारले, 'या रूममध्ये संपूर्ण गेम उलटा-पुलटा करण्याची ताकद आहे. आपण काय निवडणार?” यावरून लक्षात येते की या रूममध्ये जाणाऱ्या स्पर्धकाला विशेष पॉवर मिळू शकते. ज्याचा वापर पुढील चॅलेंज्स किंवा इतरांच्या विरोधात केला जाऊ शकतो.

शोचे पहिले आठवडा खूपच रंजक होता. पहिल्या आठवड्यात कोणालाही घरातून बाहेर काढण्यात आले नाही आणि नॉमिनेट स्पर्धक दुसऱ्या आठवड्यातही खेळणार आहेत. पुढील भागात काय होणार हे पाहण्यासाठी 'बिग बॉस मराठी ६' हा शो रात्री 8 वाजता 'कलर्स मराठी' आणि ‘जिओहॉटस्टार’वर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: तो प्रवास ठरला अखरेचा! मांजा अडकल्याने दुचाकी पुलावरून खाली कोसळली, बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: बिबट्याची दहशत आणि कांदा दरावरून उमेदवाराची हटके एन्ट्री

Haldi- Kumkum Gifts: हळदी- कुंकूवासाठी सर्वात बेस्ट, आजच खरेदी करा हे 5 वाण

Crime: कामाच्या बहाण्यानं राजस्थानला बोलावलं; १० दिवस डांबून सामुहिक अत्याचार नंतर..., महाराष्ट्रातल्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Kidney Health: डायबेटीज आणि BPमुळे होतं किडनीचं नुकसान? डॉक्टरांनी सांगितलं धोकादायक सत्य

SCROLL FOR NEXT