Kedar Shinde SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kedar Shinde : सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' फ्लॉप का झाला? केदार शिंदेंनी सगळं सांगितलं, वाचा काय म्हणाले?

Kedar Shinde Reaction Zapuk Zupuk Failure : 'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटाला प्रेक्षकांनी जास्त पसंतीस दिली नाही. केदार शिंदें यांनी 'झापुक झुपूक'च्या अपयशाचे कारण सांगितले आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण हा 'झापुक झुपूक' चित्रपटाचा हिरो आहे.

'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला.

केदार शिंदें यांनी 'झापुक झुपूक'च्या अपयशाचे कारण सांगितले आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा (Bigg Boss Marathi 5) विजेता सूरज चव्हाण ( Suraj Chavan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अलिकडेच त्याचा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk ) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळाली नाही. प्रेक्षकांनी चित्रपटाला भरपूर पसंती दिली नाही. ज्यामुळे 'झापुक झुपूक'ला यश मिळाले नाही. 'झापुक झुपूक' च्या अपयशाची अनेक कारणे समोर आली. अनेक कलाकारांनी यावर आपले मत मांडले आहे. आता अखेर चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी मौन सोडले आहे. त्यांनी चित्रपटाच्या अपयशाचे खरे कारण सांगितले आहे.

नुकत्याच एका मिडिया मुलाखतीत केदार शिंदे यांना 'झापुक झुपूक' च्या अपयशाबद्दल विचारण्यात आले. त्यावर केदार शिंदे म्हणाले की,"माझ्या विचारांत काहीतरी खोट असेल. लोकांना सूरज चव्हाणला अभिनेता बघायचा नसेल. त्यामुळे सिनेमा लोकांनी पाहिला नाही. त्यांनी ही गोष्ट नाकारली."

पुढे केदार शिंदे म्हणाले नवीन प्रोजक्ट बद्दल म्हणाले की, "आता प्रेक्षकांच्या मनात मी माझी जागा कशी निर्माण करणार, याचे प्रयत्न सुरू केले आहेत. माझा असा दावा नाही की, आता मी जे करेन ते लोकांना आवडेल. मात्र मी जी गोष्ट 'झापुक झुपूक' मध्ये केली होती. ती यात करणार नाही.यशाचा कोणताच फॉर्म्युला नाही." आता चाहते केदार शिंदे यांच्या नवीन प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

'झापुक झुपूक' चित्रपट

'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'झापुक झुपूक' हा कौटुंबिक मनोरंजन देणारा मराठी चित्रपट आहे. चित्रपटात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे असे अनेक मोठे कलाकार झळकले. 'झापुक झुपूक' बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही.

'झापुक झुपूक' कधी रिलीज झाला?

25 एप्रिल

'झापुक झुपूक'चा हिरो कोण?

सूरज चव्हाण

'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शक कोण?

केदार शिंदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Police Bharti: पोलीस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण; ५२७ कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता अन् महत्त्वाच्या तारखा

Maharashtra Live News Update: अलिबाग समुद्रात दोन तरुण बुडले, शोध सुरू

Maharashtra Politics: मोर्चात ठाकरेंची बडवा-बडवीची भाषा, ठाकरेंची एकी, महायुतीला धडकी?

Maharashra News: महाराष्ट्रात येणार केंद्राचं पथक; पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार

रात्री १२ वाजेनंतर पुरुषांचा मूड का होतो रोमँटिक?

SCROLL FOR NEXT