Suraj Chavan Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Wedding : सूरज चव्हणच्या लग्नात 'किलर गर्ल' संतापली; जान्हवी किल्लेकरनं हात जोडून पाहुण्यांना केली विनंती, VIDEO होतोय व्हायरल

jahnavi killekar Angry In Suraj Chavan Wedding : थाटामाटात सूरज चव्हाणचा लग्न सोहळा पार पडला आहे. लग्नातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर पाहुण्यांच्या गर्दीवर भडकताना दिसत आहे.

Shreya Maskar

सूरज चव्हाण नुकताच लग्न बंधनात अडकला आहे.

सूरज चव्हाणची मानलेली बहीण, मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर लग्नात उपस्थित होती.

जान्हवी किल्लेकर लग्नात पाहुण्यांच्या गर्दीवर खूप भडकली.

'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाण अखेर लग्न बंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सूरज चव्हाणने मामाची मुलगी संजनासोबत 29 नोव्हेंबर लग्नगाठ बांधली. सूरजच्या लग्नाच्या प्रत्येक समारंभात त्याची मानलेली बहीण जान्हवी किल्लेकर दिसली. बिग बॉसच्या घरात असताना जान्हवी आणि सूरजची ओळख झाली. तेव्हापासून जान्हवी सूरजला भाऊ मानते. नेहमी त्याला पाठिंबा देताना दिसते.

सध्या सोशल मीडियावर जान्हवी किल्लेकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात जान्हवी किल्लेकर संतापलेली पाहायला मिळत आहे. सूरज चव्हाणचे लग्न माऊली गार्डन हॉलवर झाले. हे ठिकाण सासवड-जेजुरी रोड, पुरंदर तालुक्यात , पुणे जिल्ह्यात आहे. सूरजला पाहण्यासाठी, त्याच्या लग्न सोहळ्यासाठी पाहुण्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. सर्वांना सूरजसोबत फोटो काढायचे होते. त्यामुळे वाढती गर्दी पाहताच जान्हवी किल्लेकर भडकली. तिने माइक हातात घेतला आणि आलेल्या पाहुण्यांना चांगले सुनावले.

जान्हवी नेमकं काय म्हणाली?

जान्हवी म्हणाली की, "...आणि आपण लग्नाला आलो आहोत तर त्याचं लग्न तरी लागूद्या. त्याचं लग्न लागू नये असं वाटतंय का तुम्हाला? तो आतमध्ये वैतागून बसलाल यार...प्लीज, थोडावेळ तरी समजून घ्या. प्लीज मी तुम्हालाना हात जोडून नमस्कार करते. प्लीज...सर्वांचं डोकं आता फिरले आहे. विनंती करतेय मी तुम्हाला... प्लीज आता सूरजला बाहेर येऊ द्या, कोणी काहीच करू नका..."

सूरज चव्हाणच्या लग्नाला 'बिग बॉस मराठी 5' चे कलाकार पाहायला मिळाले. यात जान्हवी किल्लेकरसोबत धनंजय पोवार, पुरुषोत्तम दादा पाटील असे अजून कलाकार पाहायला मिळाले. जान्हवीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी भाऊ-बहिणीच्या नात्यांचे, प्रेमाचे कौतुक करताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acid drinking accident: पाणी समजून अ‍ॅसिड प्यायला, तोंडापासून ते घशापर्यंचा भाग जळाला; डॉक्टरांनी वाचवले २ वर्षांच्या चिमुकल्याचं प्राण

Marathi Actor Death: मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा; हरहुन्नरी अभिनेता- दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

Suraj Chavan Video : हातावर किस अन् मांडीवर बसवलं...; सूरज चव्हाणचा बायकोसोबत रोमँटिक अंदाज

Maharashtra Live News Update: मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकात बैठक सुरू

Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केल्याचा राग, बापाकडून गर्भवती मुलीची हत्या; नवरा अन् सासू-सासऱ्यांनाही सोडलं नाही

SCROLL FOR NEXT