Suraj Chavan  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल

Suraj Chavan Blessed With Baby Girl : 'बिग बॉस मराठी' विजेत्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. 'बिग बॉस मराठी' ५ व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण बाबा झाला आहे.

Shreya Maskar

लोकप्रिय मराठमोळा अभिनेता झाला बाबा

जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी

हॉस्पिटलमधील व्हिडीओ होतोय व्हायरल

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाणने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर ( ४ सप्टेंबर २०२६) मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. गुलीगत किंग सूरज चव्हाण बाबा झाला आहे. जन्माष्टमीच्या दिवशी सूरजच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. संजणाने गोंडस लेकीला जन्म दिला आहे. ही माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सूरज चव्हाण बाबा होणार असल्याची माहिती सूरजची मानलेली बहीण आणि मराठमोळी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने दिली होती. संजनाची चोरओटी भरल्याचा जान्हवीने व्हिडीओ शेअर केला होता. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, संजना "आमच्या घरी राधा आलीये" असे म्हणत आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

संजनाची डिलिव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधला एक व्हिडीओ समोर आलाय. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लेक झाल्याचा आनंद सूरज-संजनाला गगनात मावेनासा झाला आहे. सूरज संजनाला प्रेमाने जवळ घेतो आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करताना दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची गर्दी पाहायला मिळत आहे. सूरज आणि संजना आई-बाबा झाल्याचे समजताच चाहते सोशल मीडियावर कमेंट्सचा, शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. त्यांना नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.

Suraj Chavan

आता सूरज आणि संजना आपल्या लेकीचे नाव काय ठेवणार प्रेक्षक याची वाट पाहत आहेत. गुलीगत किंग सूरज चव्हाण आणि संजना २९ नोव्हेंबर २०२५ लग्न बंधनात अडकले. त्याचा शाही विवाह सोहळा बारामतीत पार पडला. सूरज चव्हाण हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याला 'बिग बॉस मराठी ५' मुळे लोकप्रियता मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपयांचा हप्ता येणार? वाचा नविन अपडेट

Amrit Bharat : नव्या अमृत भारत ट्रेनची घोषणा; ४ राज्यातून धावणार,२० स्थानकावर थांबणार, A टू Z माहिती

चहाची टपरीवाला,भाजी विक्रेत्यालाही GSTची नोंदणी करावी लागते? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: पुण्याचा पाचवा मानाचा गणपती, केसरी वाड्यातील गणपतीचं 6 वाजता विसर्जन

घरात आढळणारी पाल खरंच विषारी असते का? चावा घेतल्यास काय करावं?

SCROLL FOR NEXT