सलमान खान करणार 'बिग बॉस २०' चे होस्टिंग
सोशल मीडियावर रंगली स्पर्धकांच्या नावाची चर्चा
'बिग बॉस २०' मध्ये यंदा तथास्तु-टू थीम पाहायला मिळणार आहे
लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस आता पुन्हा एकदा नवीन सीझनसोबत नवीन ट्विस्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वत्र भाईजानच्या 'बिग बॉस २०'ची चर्चा पाहायला मिळत आहे. सलमान खान देखील यंदा एक नवीन अंदाजात पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस २०' काही तासांतच सुरू होणार आहे. यंदा सीझनमध्ये कोण-कोणते कलाकार झळकणार जाणून घेऊयात.
सलमान खानच्या 'बिग बॉस २०' साठी सोशल मीडियावर कोणा-कोणाच्या नावाची चर्चा रंगली आहे, जाणून घेऊयात. माही विज, गुल्लू उर्फ कुशल तंवर, अर्शिफा खान, कनिका मान, ईशा रिखी आणि काझी तौकीर यांची नावे आघाडीवर चर्चेत आहे. लव्ह गिल आणि रिया अहिर यांना देखील घरात प्रवेश करण्याची संधी मिळणार असल्याचे बोले जात आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आम्रपाली दुबे देखील चर्चेत आहे. तसेच अभिनेत्री गीता बसरा हे आणखी एक नाव समोर आले आहे. '
लॉक अप' फेम अंजली अरोरा, 'कैसी ये यारियां'चे कलाकार पार्थ समथान आणि निती टेलर, अभिनेत्री दीपिका सिंग, युक्ती कपूर आणि प्रणाली राठोड, तसेच कॉमेडीयन सुनील पाल हे देखील संभाव्य स्पर्धकांच्या यादीत आहेत. चर्चेत असलेल्या संभाव्य स्पर्धकांमध्ये 'नागिन' फेम मौनी रॉयचाही समावेश आहे, जी या सीझनची 'स्टार एन्ट्री' ठरू शकते. आमिर खानचा भाऊ फैसल खान याचे नावही चर्चेत आहे. करण वाही, खुशी दुबे, अमन गांधी घरात प्रवेश करणार असल्याचे बोले जात आहे. 'पंचायत' फेम आसिफ खान देखील 'बिग बॉस २०' मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप कोणतीही अधिकृत स्पर्धकांची यादी जाहीर झाली नाही. याची माहिती 'बिग बॉस २०'च्या ग्रँड प्रीमियरला समजेल.
'बिग बॉस २०' चा ग्रँड प्रीमियर 6 सप्टेंबर 2026 रोजी थाटामाटात पार पडेल. हा रिॲलिटी शो आधी JioHotstar वर रात्री 9 वाजता स्ट्रीम होईल आणि नंतर रात्री 10.30 वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित होईल.
'बिग बॉस २०' ची थीम ‘तथास-टू’ आहे. बिग बॉस 20 मध्ये 'अतिरिक्त जीवन दान' ट्विस्ट देखील असेल, जे स्पर्धकांना गेम दरम्यान अतिरिक्त जीवनरेखा देईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.