Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल, 3 ऑक्टोबरपासून 'या' वेळेत दिसणार; नेमकं कारण काय?

Bigg Boss Marathi New Timing : शेवटच्या आठवड्यात फक्त ३ दिवसांसाठी बिग बॉस मराठीचा वेळ बदलण्यात आला आहे. कार्यक्रमाची नवी वेळ जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलं आहे. प्रत्येकजण आपला चांगला खेळ दाखवत आहे. प्रत्येकालाच बिग बॉसची ट्रॉफी घरी घेऊन जायची आहे. प्रेक्षक रोज ९ ची वाट पाहत असतात. की केव्हा बिग बॉस सुरू होणार आणि आपण आनंद घेणार. मात्र हा आनंद आता काही दिवसांपुरताच मर्यादित आहे. कारण बिग बॉस मराठी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पण निरोप घेण्याआधीच 'बिग बॉस मराठी' च्या वेळेमध्ये बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

'कलर्स मराठी' वर लवकरच येणाऱ्या एका मालिकेमुळे बिग बॉस मराठीची वेळ बदलण्यात आली आहे. 3 ऑक्टोबरपासून दररोज रात्री 9 वाजता 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी काही दिवसात भक्तांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून आई तुळजाभवानी (Aai Tulja Bhavani ) घरोघरी पोहचणार आहे. ही मालिका 9 वाजता प्रसारित केली जाणार असल्यामुळे 3 ऑक्टोबरपासून ते 5 ऑक्टोबरपर्यंत 'बिग बॉस मराठी' 9.30 या नव्या वेळेत पाहता येणार आहे. 'बिग बॉस मराठी' चा महाअंतिम सोहळा 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

स्पर्धांसोबतच प्रेक्षकही बिग बॉस फिनालेची वाट पाहत आहे. कोण जिंकणार बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. नुकताच बिग बॉसच्या घरात सदस्यांचे कुटुंब त्यांना भेटायला आले होते. त्यामुळे सर्वच खूप भावुक झालेले पाहायला मिळाले. तसेच बिग बॉसच्या घरात माजी बिग बॉस स्पर्धक देखील आले होते. अनिल थत्ते, राखी सावंत, अभिजीत बिचुकले यांनी स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT