Big Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi : फटकळ निक्कीचे छोट्या पुढारीने केले भरभरून कौतुक, म्हणाला...

Ghanshyam Darode : बिग बॉस घराबाहेर पडलेल्या घन:श्यामने निक्की तांबोळीचे भरभरून कौतुक केले. पाहा छोटा पुढारी काय बोला.

Shreya Maskar

बिग बॉस मराठी (Big Boss Marathi ) सध्या सर्वत्र गाजत आहे. नवीन आलेल्या वाइल्ड कार्ड एंट्री सदस्याने देखील घरी राडा घालायला सुरूवात केली आहे. या आठवड्यात अजून काय पाहायला मिळणार आहे, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) बाहेर पडला.

घरातून बाहेर पडल्यावर घन:श्याम दरोडेने बिग बॉस घरातील वादग्रस्त सदस्य निक्की तांबोळी विषयी भरभरून बोला. नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर (Bhaucha Dhakka) निक्कीला (Nikki Tamboli ) तिच्या वागण्यावरून दोन मोठ्या शिक्षा देण्यात आल्या. तिची संपूर्ण सीझनसाठी कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. तसेच तिला भांडी घासण्याची शिक्षा देखील देण्यात आली. रितेश भाऊंनी तिला खूप सुनावले.

घरातून निघाल्यावर एका मुलाखतीत निक्की विषयी बोलताना घनश्याम दरोडो म्हणाला की, माझं आणि निक्कीचं नातं बहिण-भावासारखा आहे. निक्की फटकळ जरी असली तरी मनाने प्रेमळ आहे. महाराष्ट्राने फक्त तिची एक बाजू पाहिली आहे. मात्र महाराष्ट्राने निक्कीची दुसरी प्रेमळ बाजू पाहिली नाही. बिग बॉस घरात निक्कीने प्रत्येक वेळी माझी काळजी घेतली आहे. शेवटी घन:श्याम बोला, मला कायम दुःख राहील की, मी प्रेक्षकांच्या मनात जागा करायला कमी पडलो. तसेच छोटा पुढारीने सूरजचे (Suraj Chavan) देखील कौतुक केले आणि त्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT