Ankita Walawalkar Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar Wedding : अखेर 'कोकण हार्टेड गर्ल' अडकली लग्नबंधनात, कुठे पार पडला शाही विवाहसोहळा?

Ankita-kunal Wedding Photos : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

अखेर 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) लग्नबंधनात अडकली आहे. अनेक दिवसांपासून अंकिता वालावलकरच्या (Ankita Walawalkar) घरी लगीनघाई पाहायला मिळत होती. कोकणात आपल्या गावी अंकिताने आपला लग्न समारंभ पार पाडला आहे. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद प्रत्येक समारंभाला अंकिता आणि कुणाल (Kunal Bhagat ) खूप हटके दिसत होते. कोकणातील एका मंदिरात अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतने लग्नगाठ बांधून आपल्या नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे.

अंकिता आणि कुणालचा शाही विवाह सोहळा लक्ष्मीनारायण मंदिरात पार पडला. हे मंदिर सिंधुदुर्गमध्ये येते. लग्नासाठी अंकिता आणि कुणालने पारंपरिक लूक केला होता. अंकिताने लग्नात पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. तर कुणालने देखील अंकिताला साजेल असा मराठमोळा पेहराव केला होता. हिरवा चुडा, मुंडावळ्या घालून अंकिताचा लूक खुलला होता. दोघेही एकत्र खूपच छान दिसत होते.

अंकिताने आपल्या नवऱ्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. ज्यात तिने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. अंकिताने लिहिलं की, "वालावलकरांचो थोरलो जावई! कुणाल तुला मी बायको म्हणून मिळाली, यासाठी तुझं खूप अभिनंदन! तू खूप लकी आहेस." सध्या अंकिता आणि कुणालवर कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.

अंकिता सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. मात्र तिला 'बिग बॉस मराठी 5' खूप लोकप्रियता मिळाली. अंकिता ही एक यशस्वी व्यावसायिक देखील आहे. कुणाल भगत हा प्रसिद्ध संगीतकार आहे. त्याने आजवर अनेक गाण्यांचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम, 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट; वाचा हवामान अंदाज

Maharashtra News Live Update : भीमाशंकर मंदिर आज पासून भाविकांसाठी खुले; भाविकांची मोठी गर्दी

JOB Tips : नवीन नोकरी जॉइनिंग करण्यापूर्वी 'ही' ५ कामे करा, नाहीतर डोक्याला हात लावण्याची येईल वेळ

आजपासून 'माथेरानची राणी' पावसाळी सुट्टीवर, ४ महिने मिनी ट्रेन घेणार विश्रांती; अमन लॉज-माथेरान शटल सेवा राहणार सुरू

एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण; मृतकाच्या सख्ख्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल, वाशिम हादरले

SCROLL FOR NEXT