kartik Aaryan : पुष्पाच्या अभिनेत्रीसोबत कार्तिक आर्यनचा रोमान्स, टीझरने घातला धुमाकूळ

Aashiqui 3 Teaser: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये कार्तिक साऊथ अभिनेत्रीसोबत पाहायला मिळत आहे.
Aashiqui 3 Teaser
kartik AaryanSAAM TV
Published On

बॉलिवूडचा 'रूह बाबा' सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टमुळे चांगलाच चर्चेत आहे. कार्तिक आर्यन (kartik Aaryan) लवकरच 'आशिकी 3'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. तसेच चित्रपटाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कार्तिक आर्यनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या चित्रपटात कार्तिक एका नव्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे.

अनुराग बासू हे 'आशिकी 3'चे दिग्दर्शक आहेत. त्यांनी एका मिडिया मुलाखतीत कार्तिक आर्यनसोबत एक चित्रपट करणार असून तो एक रोमँटिक-म्युझिकल ड्रामा असल्याचे सांगितले होते. त्यामुळे टीझर रिलीज झाल्यावर हा 'आशिकी 3' चा टीझर असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.

कार्तिकच्या आगामी चित्रपटाचा टीझर

कार्तिकने शेअर केलेल्या टीझरमध्ये त्याचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. लांब दाढी आणि हातात गिटार घेऊन कार्तिक आर्यन गाणे गाताना पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये कार्तिक आर्यन प्रियकराच्या लूकमध्ये दिसत आहे.प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या कॉन्सर्टमध्ये कार्तिक आर्यन हातात गिटार घेऊन गाणे गात आहे. तोंडात सिगारेट आणि हातात गिटार घेतल्याचा त्याचा लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

साऊथ अभिनेत्री कोण?

कार्तिक आर्यनच्या रोमँटिक म्युझिकल ड्रामामध्ये कार्तिक आर्यन पुष्पा 2 फेम अभिनेत्री श्रीलीलासोबत रोमान्स करताना दिसत आहे. श्रीलीला ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या टीझरमध्ये श्रीलीलाची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधून कार्तिक आणि श्रीलीलाची जबरदस्त केमिस्ट्री पाहून चाहते दिवाने झाले आहेत.

कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. मात्र हा चित्रपट 2025 च्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता हा 'आशिकी 3' चित्रपट असेल की दुसरा कोणता हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. कार्तिक आर्यनने आदित्य रॉय कपूरलाही मागे टाकल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Aashiqui 3 Teaser
Chhaava Online Leaked : विकीचा 'छावा' ऑनलाइन लीक, पायरसीचा झटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com