Chhaava Piracy
Chhaava Online LeakedSAAM TV

Chhaava Online Leaked : विकीचा 'छावा' ऑनलाइन लीक, पायरसीचा झटका

Chhaava Piracy : सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'छावा' चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे.
Published on

लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' (Chhaava ) चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट जवळपास तब्बल 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि महाराणी येसूबाईंची भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहेत.

'छावा' ऑनलाइन लीक

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. 'छावा' चित्रपट पायरसी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 'छावा'च्या रिलीजनंतर अवघ्या काही तासांत 'छावा' ऑनलाइन लीक झाला आहे. अनेक पायरसी वेबसाइटवर 'छावा' चित्रपट अपलोड करण्यात आला आहे. ज्यामुळे काही प्रमाणात निर्मात्यांना फटका बसला आहे. छावा मूव्ही डाउनलोड आणि छावा फ्री एचडीसारखे कीवर्ड देखील ट्रेंडिंग आहेत. पायरसीमुळे छावाच्या कलेक्शनवर परिणाम होऊ शकतो.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'छावा' चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. 'छावा' चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 36.50 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत दोन दिवसात चित्रपटाने तब्बल 67.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. विकी कौशलचा 'छावा' चित्रपट आता लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'छावा' चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

'छावा' ओटीटी अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा' चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सने चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स खरेदी केले आहेत. 'छावा' तीन ते चार महिन्यांनंतर घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप निर्मात्यांनी ओटीटी रिलीजच्या डेटची कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. 'छावा' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये छप्परफाड कमाई केली आहे. जवळपास 5 कोटींची व्यवसाय त्यांनी केला आहे.

Chhaava Piracy
Chhaava Box Office Collection : आया रे तुफान... 'छावा'चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com