Ghanshyam Darode  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ghanshyam Darode : 'छोटा पुढारी' गंभीर आजाराने ग्रस्त, म्हणाला- फुफ्फुसांना सूज अन्...

Ghanshyam Darode Health Issues : 'छोटा पुढारी' घनश्याम दरवडेला 'बिग बॉस मराठी'मुळे खूप प्रसिद्धी मिळाली. सध्या तो त्याच्या हेल्थमुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5'मुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला घनश्याम दरवडे कायम आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलचा चर्चेत असतो. त्याला महाराष्ट्रात 'छोटा पुढारी' म्हणून ओळखले जाते. बिग बॉसमधील त्याचा खेळ चाहत्यांना खूप आवडला. घनश्यामला अनेक वेळा त्याच्या कमी उंचीमुळे ट्रोल करण्यात येते. आता मात्र 'छोटा पुढारी' (Ghanshyam Darode) एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच झालेल्या एका मिडिया मुलाखतीत त्याने आपल्या हेल्थचे अपडेट दिले आहेत.

घनश्यामने मुलाखतीत त्याला किडनी, यकृत आणि फुफ्फुसा संबंधित आजार असल्याचा मोठा खुलासा केला आहे. घनश्यामने मुलाखतीत सांगितल्यानुसार, घनश्याम 6 वर्षांचा होईपर्यंत हॉस्पिटलमध्ये होता. त्याला अजूनही यकृत आणि किडनीचा त्रास आहे. त्याला कायम लहान उंचीमुळे डावलले जायचे. लोक त्याला नाव ठेवायचे. मात्र त्याच्या आई-वडिलांनी त्याला कायम साथ दिली. त्यामुळे आयुष्यात मी मोठा झाला. घनश्याम म्हणाला, "आता मी जे काही आहे ते माझ्या आई-वडिलांमुळेच"

घनश्यामला सातवीत असताना आजारपणाबद्दल कळले होते. माझ्या वयाच्या सगळ्यांची उंची वाढली पण माझी नाही. त्याने अनेक वेळा तब्येतीबाबत घरच्यांना विचारले पण त्याला उत्तर मिळाले नाही. म्हणून त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला. तेव्हा डॉक्टरांनी घनश्यामला त्याच्या आजाराविषयी सांगितले.

घनश्यामच्या डॉक्टरांनी त्याला सांगितल्यानुसार घनश्यामला आनुवंशिकतेचा त्रास आहे. तसेच त्याला थायरॉईड देखील आहे. त्याच्या यकृत आणि फुप्फुसांना सूज आहे आणि किडनीलाही त्रास आहे. घनश्याम मुलाखतीत बोलला की, मी आताही इंजेक्शन घेतो. कारण माझे शरीरात रक्त आपोआप तयार होत नाही. रक्त शुद्ध करण्यासाठी इंजेक्शन घ्यावे लागते.

वर्कफ्रंट

'बिग बॉस मराठी 5' मध्ये घनश्याम दरवडेने खूप धुमाकूळ घातला. सध्या तो 'शिट्टी वाजली रे' या कुकिंग शोमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Patil Accident: फडणवीसांच्या ताफ्यातील ड्रायव्हरनं कार अचानक पुढे घेतली; भाजप नेता थेट जमिनीवर आपटला|VIDEO

Mangalore Fort History: मंगरूळगड तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या इतिहास आणि किल्ल्याची वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: नाशिकच्या वडनेर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात २ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

कल्याणचा स्कायवॉक नेमका कुणासाठी? फेरीवाले, गर्दुल्ले अन् वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा वावर; नागरिक संतापले

Shocking : अजबच! तरुणाच्या पोटात २९ स्टीलचे चमचे आणि १९ टूथब्रश, ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनाही बसला धक्का

SCROLL FOR NEXT