Bigg Boss Marathi Winner canva
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Suraj Chavan Marathi Bigg Boss Winner: सूरज चव्हान बिग बॉस मराठीच्या ५व्या सिझनचा विजोता ठरला आहे. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजच्या गावामध्ये गावकऱ्याकडून फटाक्यांची आतीशबाजी करण्यात आली आहे.

Saam Tv

बिग बॉस मराठीचा ५व्या सीझनचा ग्रँड फिनाले आज पार पडला. बिग बॉस मराठीच्या ५च्या पर्वाचा विजेता नेमकं कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या बहुप्रतिक्षित सोहळ्याची प्रेक्षकांची उटकंठा शिगेला पोहोचली होती. अभिनेता रितेश देशमुख यांनी बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनच्या विजेताची घोषणा केली. बिग बॉ मराठीच्या ५व्या पर्वाच्या विजेता सूरज चव्हान ठरला आहे. त्यासोबत अभिजीत या सीझनचा उपविजेता ठरला आहे.

बिग बॉस मराठीच्या ५व्या सीझनला २८ जुलैपासून सुरुवात झाली होती. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १६ सदस्य सहभागी झाली होती. या १६ सदस्यांमधील टॉप ६ फायनलिस्ट बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले होते. यंदाचा बिग बॉस १०० दिवसांचा नाही तर ७० दिवसांचा होता.

बिग बॉस मराठीमध्ये अभिजीत सावंत आणि सूरज चव्हान हे सदस्य टॉप २ मध्ये होते. त्यानंतर रितेश भाऊंकडून बिग बॉस मराठीच्या विजेताची घोषणा करण्यात आली. सूरज चव्हान बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता ठरला आहे. सूरजला १४.१६० लाख रक्कम आणि एक इलेक्ट्रीक स्कूटर मिळाली आहे. बिग बॉसच्या संपूर्ण सीझनमध्ये सूजर कोणत्या ना कोणत्या करणांमुळे चर्चेचा विषय राहिला होता. सूज बिग बॉसच्या ५व्या सीझनचा विजेता ठरल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे. सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

सुरज चव्हाण बारामती तालुक्यातील मोडवे या गावातला रहिवासी आहे. त्याच्या विजयानंतर मोडवे गावामध्ये त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे. गावकऱ्यानी फटाके फोडून आणि् गुलालाची उधळण करीत आनंद साजरा आहे. त्यासोबतच बिग बॉस विजेता गावामध्ये परत आल्यावर गावकऱ्याकडून त्याच्या मिरवणुकीची तयारी करण्यात आली आहे. गावामधील वरिष्ठांच्या आणि सरपंचांकडून सूरचे गावात आल्यावर सत्कार करणार आहे. त्यासोबतच बारामतीमधील अनेक लोकांनी त्यांच्या व्हाट्सएपवर स्टेटस ठेवत सुरजचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यानी सूरजचे भरभरुन कौतुक केले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT