सध्या मनोरंजनसृष्टीत प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अनेकांनी 2024 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. तर आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या असच एक कपल चर्चेत आले आहे. बिग बॉस फेम अभिनेत्याने सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देली आहे.
'बिग बॉस मराठी 4' विजेता अभिनेता अक्षय केळकरने (Akshay Kelkar) नुकताच आपल्या प्रेमाचा चाहत्यांकडे खुलासा केला आहे. अक्षय केळकर कायमच आपल्या कामामुळे चर्चेत राहिला आहे. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. अक्षय अभिनयासोबतच त्याच्या निवेदनासाठी ओळखला जातो. बिग बॉसच्या घरात आपल्या गेमने त्याने अनेक चाहत्यांची मने जिंकली आहे.
अखेर अक्षय केळकरची 'रमा'समोर आली आहे. अक्षयने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. आजच म्हणजे (२३ डिसेंबर) या दोघांच्या नात्याला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. अक्षयने आपल्या पोस्टला एक हटके कॅप्शन दिलं आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
"तर ही माझी रमा…उद्या आम्हाला 10 वर्ष पूर्ण होतायत … म्हंटल एक दिवस आधीच सांगाव ... म्हणून... बापरे, फाइनली सांगतोय मी … पण काहीही झाल तरी i love you मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही"
अक्षय केळकरची 'रमा' ही गायिका आहे. तिचे नाव साधना काकतकर आहे. तिने अनेक गाणी गायली आहेत. आपल्या मधुर आवाजाने तिने अनेकांना वेड लावले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अक्षयला रमा-माधव ही जोडी खूप आवडते. म्हणून तो आपल्या गर्लफ्रेंडला सुरुवातीपासूनच 'रमा' अशी हाक मारतो.
अक्षय केळकरच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे खूपच सुंदर दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात असताना अक्षयने आपल्या गर्लफ्रेंडविषयी सांगितले होते. मात्र त्याची 'रमा' नक्की कोण याचा खुलासा त्यांना आता केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.