
कलर्स मराठी वाहिनीवरील 'रमा राघव' (Rama Radhav Serial) ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत असून मालिकेतील खट्याळ रमा आणि प्रमेळ राघव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या मालिकेमध्ये आता रमा आणि राघव यांचे लग्न होणार आहे. रमा-राघवच्या लग्नाची (Rama- Raghav Wedding) सध्या जोरदार तयारी असून प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.
रमा-राघव मालिकेमध्ये रमा आणि राघवचा लग्न सप्ताह जोरदार रंगला आहे. चुडा, मेहंदी, संगीत, हळद या कार्यक्रमांनी उतरोत्तर रंगलेल्या या सोहळ्याचा परमोच्च बिंदू म्हणजेच मराठमोळा साज असलेला लग्न सोहळा. या लग्नसोहळ्याची प्रेक्षकांना खूपच आतुरता लागली आहे. रमा आणि राघवचा लग्नसोहळा येत्या रविवारी म्हणजे १७ मार्चला दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता रंगणार आहे.
गेले कित्येक महिने सोशल मिडियावर सातत्याने ज्याची मागणी प्रेक्षकांकडून केली जात होती ते रमा-राघवचे बहुप्रतीक्षित विधिवत लग्न पेशवाई थाटात आणि दोन्ही कुटुंबांच्या जल्लोषात थाटामाटात रंगणार आहे. अलिकडे दुर्मिळ होत चाललेले सगळे मराठमोळे लग्नविधी या लग्न सोहळ्यात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. वडीलधाऱ्यांच्या साक्षीने आपले पुन्हा लग्न व्हावे ही रमा-राघवची आणि पर्यायाने प्रेक्षकांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होणार आहे. आतापर्यंत रमा आणि राघव यांच्या आयुष्यात आलेली वादळे पाहता हे लग्न निर्विघ्न पार पडावे ही रमा-राघव यांच्यासोबत आणि प्रेक्षकांची इच्छा आहे.
पुरोहित आणि परांजपे कुटुंबाचा हा एकत्रित लग्नसोहळा ज्या जल्लोषात लग्नसप्ताह पार पडला. त्याच उत्साहात धुमधडाक्यात साजरा होणार असून रमा राघवच्या आयुष्याच्या या नव्या सुरुवातीची प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. या मराठमोळ्या लग्नसोहळ्यात रमा-राघवचा पेशवाई पेहराव हे वेगळेपण असून राघवचे राजबिंडे रूप आणि रमाचे खुलून आलेले खानदानी सौंदर्य विलोभनीय आहे. पारंपरिक पोशाख, दागिने यांनी सजलेल्या या सोहळ्यात रमाचे 'रमाराघव' या अक्षरामध्ये लिहिलेले मंगळसूत्र हे वेगळेपणामुळे चर्चेत आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.