Nikhil Rajshirke Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikhil Rajshirke: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्यानं केलं लग्न; निखिल राजेशिर्केची पत्नी कोण?

Bigg Boss Fame Nikhil Rajshirke Wedding: निखिलचा लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर निखिलाच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

Manasvi Choudhary

बिग बॉस फेम निखिल राजेशिर्के त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लक्ष वेधून घेत आहे. निखिलाच्या नवीन आयुष्याची सुरूवात झाली आहे. नुकतंच काल रविवारी निखिलचा लग्नसोहळा पार पडला. सोशल मीडियावर निखिलाच्या लग्नाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून निखिलने अलिकडेच लग्नाची गुडन्यूज चाहत्यासोबत शेअर केली होती. सोशल मीडियावर निखिलने प्रीवेडिंगचे फोटो देखील शेअर केले होते. आता काल रविवारी निखिल लग्नबंधनात अडकला आहे. सिनेसृष्टीतील काही मोजक्याच सेलिब्रिटी अन् नातेवाईकांमध्ये निखीलचा विवाहसोहळा पार पडला. निखिल राजेशिर्केने चैत्राली मोरेसोबत लग्नगाठ बांधली आहे. निखिल आणि चैत्रालीच्या लग्नाला अनेक कलाकारांची उपस्थिती पहायला मिळाली. कलाकारांनी निखिल आणि चैत्राली दोघांनाही त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव केला.

कोण आहे निखिलाची पत्नी?

निखिलाने मैत्रिण चैत्रीली मोरे हिच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. निखिल आणि चैत्राली एकमेकांना चांगले ओळखतात. निखिलच्या वडिलांच्या मित्राची मुलगी असल्याने त्यांच्या आई बाबानांही तिची ओळख होती. यांच्या नात्याची सुरूवात झाल्यानंतर एप्रिल महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता.त्यानंतर आता दोघेही एकमेकांच्या जीवनाचे साथी बनले आहेत.

निखिल राजेशिर्के बिग बॉसच्या घरातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यासह अनेक टिव्ही मालिकांमध्ये निखिलाने काम केले आहे. रंग माझा वेगळा, अरूंधती, छोटी मालकीण, माझी तुझी रेशीमगाठ यासारख्या मालिकांमधून निखिल घराघरात ओळखला जाऊ लागला. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत निखिलाने नेहाचा पती अविनाशची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT