Bigg Boss Marathi Season 4 Instagram @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस फिनाले आधीच प्रेक्षकांना सरप्राइज, एलिमिनेट झालेल्या स्पर्धकाची घरात पुन्हा एन्ट्री...

या सोहळ्यात बिग बॉसमधील जुन्या स्पर्धकांचा डान्सही होणार आहे. यासाठी सर्वांनीच जोरात तयारी सुरु केली आहे.

Chetan Bodke

Bigg Boss Marathi 4: गेल्या तीन महिन्यांपासून सर्वाधिक चर्चेत असलेला टेलिव्हिजन शो म्हणजे 'बिग बॉस मराठी.' सर्वाधिक टीआरपी देणारा हा शो येत्या रविवारी प्रेक्षकांची रजा घेणार आहे. सलग तीन महिने प्रेक्षक हा शो मोठ्या आवडीने पाहत आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही भरघोस प्रतिसाद दिला.

येत्या रविवारी अवघ्या महाराष्ट्राला बिग बॉसच्या घरातील चौथा विजेता स्पर्धक मिळणार आहे. मोठ्या दिमाखदार सोहळ्यात ही ट्रॉफी विजेत्याला दिली जाते. प्रत्येक स्पर्धकाने टॉप ५ मध्ये येण्यासाठी चांगलीच कंबर कसली.

२ ऑक्टोबरपासून मोठ्या दिमाखात सुरु झालेला हा कार्यक्रम आता लवकरच संपणार आहे. एकूण १०० दिवसांचा हा खेळ कधी संपला काय कळलंच नाही. येत्या ८ जानेवारीला बिग बॉसच्या चौथ्या सीझनचा ग्रॅंड फिनाले मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार आहे. या सोहळ्यात बिग बॉसमधील जुन्या स्पर्धकांचा डान्सही होणार आहे. यासाठी सर्वांनीच जोरात तयारी सुरु केली आहे. या सर्वच स्पर्धकांचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सर्वच जण फिनाले पूर्वी एकत्र आले आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात एकूण पाच स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. त्यातील राखी वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे. वाईल्ड कार्डच्या रुपात आलेल्या स्पर्धकांनी घरातल्या स्पर्धकांना सळो की पळो करुन ठेवले होते, परंतू आता त्यांच्यातील मैत्री बरीच घनिष्ठ झालेली दिसून येत आहे.

घराच्या बाहेर गेलेल्या विकासने किरणला पाहताच मिठी मारली. सर्वांना पुन्हा एकदा एकत्र पाहून प्रेक्षकांना मजा येणार आहे. शेवटच्या आठड्यात इविक्शन राऊंडमध्ये आरोह वेलणकर घराबाहेर गेला आहे. सध्या बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे, राखी सावंत, किरण माने आणि अक्षय केळकर हे स्पर्धक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Protein Deficiency: प्रोटीनची कमतरता असल्यास शरीर देतं 'असे' संकेत

Pune To Madgaon Torism: पुण्याहून मडगावला निघालात? वाचा रेल्वे, बस आणि फ्लाइटचे संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: बॉम्बब्लास्ट करणारे सगळे निर्दोष, या देशामध्ये बरंच चुकीचं घडतंय - यशोमती ठाकूर

Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Kalyan : कल्याण- डोंबिवलीतील त्या कर्मचाऱ्यांना १५ ऑगस्टला मिळणार नियुक्ती पत्र; २७ गावातील कर्मचाऱ्यांच्या लढ्याला अखेर यश

SCROLL FOR NEXT