Utkarsh Shinde Helped Fish Seller Woman Saam Tv
मनोरंजन बातम्या

Utkarsh Shinde Post: ‘...आणि त्यांच्या आपुलकीच्या जाळ्यात स्वतःला हरवून बसलो’; म्हावरं विकणाऱ्या मावशीला उत्कर्षने केला ‘एक हात मदतीचा’

Utkarsh Shinde News: अभिनेता उत्कर्ष शिंदे सध्या मुरूडमध्ये शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शूटिंगनंतर फावल्या वेळेत अभिनेता मुरुड- जंजिरा मच्छी मार्किट मध्ये गेला होता. यावेळी त्याने एका मच्छी विक्रेत्या मावशींसोबत संवाद साधला. या दरम्यानची पोस्ट अभिनेत्याने लिहिली.

Chetan Bodke

Utkarsh Shinde Helped Fish Seller Woman

'बिग बॉस मराठी ३' नंतर अभिनेता उत्कर्ष शिंदे घराघरात लोकप्रिय झाला. उत्कर्ष शिंदेने चाहत्यांमध्ये अभिनयाच्या आणि गाण्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांचा उत्कर्ष हा धाकटा मुलगा आहे. उत्कर्ष कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

उत्कर्ष कायमच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या मुद्द्यांवर इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतीच उत्कर्षने एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने पोस्टमध्ये मच्छी विक्रेत्या मावशींसोबत संवाद साधताना आलेला अनुभव शेअर केला आहे. (Marathi Actors)

अभिनेता, गायक आणि पेशाने डॉक्टर असलेला उत्कर्ष सध्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकतंच तो शूटिंग संपवून मुरूडला गेला होता. त्या ठिकाणी अभिनेत्याने मच्छी विक्रेत्या मावशींसोबत संवाद साधला होता. त्यांच्यासोबत संवाद साधताना आलेला अनुभव अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून शेअर केला आहे. अभिनेत्याचीही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. (Social Media)

उत्कर्ष शिंदे आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगतो, “ “हातावर मिळवायचा पानावर खायचा” शूटिंग संपवून मुरुडला गेलो. समुद्र, हिरवीगार झाडी, पद्मदुर्ग किल्ला, पाण्यात डोलणाऱ्या होड्या, पाटीलवाडा खानावळ आणि मच्छीमार बांधव जणू स्वर्गच. मासे खाण्याचा मोह आवरेना मग काय मुरुड- जंजिरा मच्छी मार्किट मध्ये गेलो. म्हटलं जाळ्यात अडकलेले ताजे मासे पाहू पण काय तिकडे एका मच्छी विकणाऱ्या आईला भेटलो आणि त्यांच्या प्रेमाच्या आपुलकीच्या गोडमखमली जाळ्यात मीच स्वतःला हरवून बसलो.” (Murud)

अनुभव सांगताना उत्कर्ष पुढे म्हणाला की, “सकाळ सकाळी मच्छी मार्केटमध्ये मासे विकणाऱ्या वासंती मावशीची भेट झाली. थोडे सुकट, बोंबिल, करदी, सोडे घेऊ म्हटलं. मावशीसोबत गप्पा रंगल्या बोलता बोलता, ‘आज थोडा ताप आहे बाळा...’ म्हणत व्यथा सांगता सांगता मावशीच्या डोळ्यात पाणी दिसलं. मी मावशी जवळ जाऊन बसलो पूर्ण व्यथा ऐकली. त्यांना येऊन गेलेले २ हार्टअटॅक, अक्सिडेंट मुळे पायात आलेले रॉड, घरची परिस्थिती नाजुक तरीही न हरणारी ती माऊली मन जिंकून गेली. ऊन वाढलं तरीही बसावं तर लागणारच ना बाळा आजचा म्हावरा विकला की घरी जाऊन आराम करता येईल म्हणाली. “हातावर मिळवायचा पानावर खायचा.” हे शब्द त्या मावशीचे, जे शब्द मनाला चटका लावून गेले.” (Bigg Boss Marathi 3)

“थोडा फार म्हावरा घ्यायला गेलेलो मी त्यांच्याकडे असलेला आख्खा माल त्यांच्या सर्व पाट्याच रिकाम्या करुन आलो. का घेतला माहित नाही पण गोण्या भरुन म्हावरा आणला आणि वासंती मावशीला ‘तुम्ही घरी जा औषध घेऊन आराम करा’ म्हणालो. मला ताजा म्हावरा तर मिळालाच पण त्या पेक्षा मोठा त्या मावशी कडून आशीर्वाद मिळाला. तुला माझ्या बल्लाळेश्वराने पाठवला आहे बाळा म्हणत ती मावशी आनंदली. काही वेळेला आपण आपल्या कृतीतून आपण बरच काही मिळवतो. जन्म एकदाच आहे, हसत मिळून मिसळून जगा. तुमच्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलुद्या. वासंती मावशीचा मुरुडचा त्या निरागसतेचा निरोप घेतला. सोबत आणला वासंती मावशीचा आशीर्वाद आणि म्हावरा.” असं अभिनेता आपल्या पोस्टमध्ये म्हणाला. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT