बॉलिवूड (Bollywood) अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सध्या '12 वी फेल' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटातील विक्रांत मेस्सीच्या अभिनयाचे आणि त्याच्या लूकचे खूपच कौतुक झाले. चित्रपटाच्या यशानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या चित्रपटासाठी आणि मनोज शर्मा यांच्यासारखं दिसण्यासाठी विक्रांत मेस्सीने खूपच मेहनत घेतली होती.
चित्रपट निर्माते विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत विक्रांत मेस्सीने विधू विनोद चोप्राच्या दिग्दर्शनाची प्रशंसा केली आणि शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. त्याने या चित्रपटामध्ये मनोज शर्मा (Manoj Sharma) यांच्यासारखे सावळं दिसण्यासाठी कोणताही मेकअप केला नव्हता. तर सावळा दिसण्यासाठी तो उन्हामध्ये बसला असल्याचे त्याने सांगितले.
'जीक्यू इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विक्रांत मेस्सीने सांगितले की, 'त्याने चित्रपटाच्या तयारीसाठी सुमारे दीड वर्षे घालवले आणि शूटिंगपूर्वीचे तीन महिने वाचन सत्रांनी भरले होते. त्याला वजन कमी करून त्वचा सावळी करावी लागली. टॅनिंग करताना त्याची त्वचा भाजली देखील होती. त्यामुळे तो या विचाराने खूप घाबरला होता की त्याला शूट काही आठवडे पुढे ढकलावे लागेल.
'12वी फेल'च्या शूटिंगदरम्यान घडलेली एक घटना आठवून विक्रांत मेस्सीने त्याची जळालेली त्वचा पाहून विधू विनोद चोप्रान कशी रिअॅक्शन दिली ते सांगितले. टॅन लपविण्यासाठी मेकअपचा अवलंब करण्याऐवजी, असे चित्रीकरण केले तर बरे होईल, असे विधू विनोद चोप्रा म्हणाले होते. त्यामुळे विक्रांतने सावळा दिसण्यासाठी उन्हात आपली त्वचा सावळी केली आणि मेकअपशिवाय शूट पूर्ण केले.
या चित्रपटाचा सर्वात कठीण भाग शेअर करताना विक्रांत मेस्सीने सांगितले की, 'त्याच्यासाठी प्रवासातील सर्वात कठीण भाग म्हणजे ही व्यक्तिरेखा साकारतानाचा भावनिक भाग होता. कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने सत्यात उतरवणारा. खरी भारतीय कथा, जी लोकांना आवडेल.' दरम्यान, वास्तविक जीवनातील अनुभवांमधून प्रेरणा घेऊन '12वी फेल' यूपीएससी करणाऱ्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचे जग दाखवते.
या चित्रपटामध्ये यूपीएससी परीक्षेत असंख्य विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने मार्मिकपणे दाखवले आहेत. आयपीएस मनोज कुमार शर्मा यांची ही कथा आहे. ज्यांना आयपीएस अधिकारी पद मिळवण्यासाठी संकटांचा सामना करावा लागतो. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप चांगली पसंती दिली असून तो सुपरहिट ठरला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.