मराठी अभिनेत्री अमृता देशमुख 'बिग बॉस मराठी'मध्ये झळकली होती.
अमृताने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
मालिकांमध्ये हिरो-हिरोईनचे कास्टिंग कसं होते, याबद्दल आपले स्पष्ट मत मांडले आहे.
मराठमोळी अभिनेत्री अमृता देशमुखने (Amruta Deshmukh) आजवर अनेक भूमिका साकरल्या आहेत. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. अमृताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती इन्स्टाग्रामवर आपल्या विविध लूकचे फोटो शेअर करत राहते. तसेच ती अनेक डान्स रील देखील बनवते. अमृता देशमुखचे युट्यूब चॅनेल देखील आहे. अमृता देशमुख अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते.
नुकताच अमृता देशमुखने युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने मनोरंजन क्षेत्रात तिला आलेल्या अनुभवाचा उल्लेख केला आहे. मालिका विश्वात कास्टिंग कसं होते यावर तिने आपले स्पष्ट मत मांडले आहे. तिने सांगितले की, "चॅनेलच्या लोकांना एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकांत झळकलेले कलाकारच हवे असतात." अमृता देशमुखने ऑडिशन देण्याची तुलना दात घासण्यासोबत केली आहे. ती म्हणते, "कलाकाराच्या आयुष्यात ऑडिशन देणे म्हणजे दात घासण्याइतका रोजची गोष्ट आहे. पण माझ्या आयुष्यात तो प्रकार वेदनादायी झालाय. कारण माझ्या आयुष्यात ऑडिशन क्वचित आणि वेदनादायी आहे. "
अमृता पुढे म्हणते की, "आपण सोशल मीडियावर पाहतो की, मलायका अरोरा जीमला जाताना तिच्या पाठीमागे पापाराझी धावतात. तसे जेव्हा मला समजते की, एखाद्या चॅनेलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे...तेव्हाच लगेच हे देखील कळते की, त्या प्रोजेक्टसाठी कास्टिंग देखील झाली आहे. जी माजी लीड होती. तिने दुसऱ्या चॅनेलवर मुख्य भूमिकेत नुकतेच काम केले आहे किंवा त्याच चॅनेलवर मुख्य भूमिकेत दिसली. कारण चॅनेलला तेच हवे असते."
शेवटी अमृता म्हणते की, "तसेच स्त्रीचे वय वाढले की ती मोठी दिसू लागते. मुख्य भूमिकेत असेलली अभिनेत्री 25-30 वर्षातली असूच शकत नाही." अमृता देशमुखने आजवर अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. तसेच ती 'बिग बॉस मराठी'मध्ये झळकली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.