Kiran Mane And Rohit Mane Upcoming Film Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Film: अतरंगी सातारकर करणार एकत्र स्क्रीन शेअर, किरण मानेसोबत दिसणार हास्यजत्रेतला ‘हा’ कलाकार

Kiran Mane Post: बिग बॉस फेम किरण माने लवकरच हास्यजत्रेतील कलाकारासोबत एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.

Chetan Bodke

Kiran Mane And Rohit Mane Upcoming Film

टेलिव्हिजन अभिनेते किरण माने सध्या ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. किरण मानेची नेहमीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक आणि मनोरंजनसृष्टीतील घडामोडींवर आपले परखड मत मांडण्याचा प्रयत्न करतो. सध्या किरण माने सोशल मीडियावर आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत आला आहे. ‘सिंधुताई माझी माई’नंतर लवकरच एका चित्रपटामध्ये दिसणार आहे.

किरण मानेने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्याच्यासोबत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम रोहित माने सुद्धा दिसणार आहे. अद्याप त्यांनी चित्रपटाचे नाव जाहीर केलेले नाहीत. “...रोह्या भेटल्या- भेटल्या म्हणाला, अहो किरणसर, चाहते सेल्फी काढायला येतात, तेव्हा कुणीतरी एक प्रश्न हमखास विचारतात, किरण मानेंचे तुम्ही नातेवाईक का? मी म्हंटलं अरे मला बी इचारत्यात, “रोहित माने तुमचा कोन?” मी सांगतो, “लहान भाऊ.” रोह्यानं मिठीच मारली.”

हास्यजत्रानं मराठीला जी अनमोल रत्नं दिली, त्यातलं हे एक रत्न. ...पहिल्यांदाच भेटलो, पण लई दिवसांची वळख असल्यागत मैत्री झाली. एकतर दोघंबी M.H.11 आणि दुसरं म्हणजे दोघंबी काळजात ‘नाटक’ जपणारे! आता आम्ही अस्सल सातारी ‘माने बंधू’ मिळून एक पिक्चर करतोय. नादखुळा इषय, भन्नाट स्टोरी, जबराट भुमिका. दोन किरानिष्ट बोड्याचे अतरंगी सातारकर एकत्र आल्यावर जाळ धूर व्हायचा त्यो हुनारच हाय. बाकी निर्माता, लेखक, दिग्दर्शक, इतर सहकलाकार याबद्दल हळूहळू सांगेन सविस्तर. आत्ता थोडी उत्सुकता तर तानूद्या की भावांनो. नाय का? पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त !” अशी पोस्ट किरण मानेने केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच किरण मानेने आपल्या प्रोजेक्टबद्दलची माहिती सोशल मीडियावर दिली होती. किरण मानेने शुटिंग दरम्यानचा एक फोटो पोस्ट केला होता. ‘आणखी एक भन्नाट भुमिका! नादखुळा लूक. पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त... स्टे ट्यून्ड.’ असं म्हणत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती.

किरण मानेच्या कामाबद्दल सांगायचे तर, ‘बिग बॉस मराठी ४’मधून त्याला सातारचा बच्चन म्हणून ओळख मिळाली. तेव्हापासून त्याला चाहते किरण माने म्हणून नाही तर ‘सातारचा बच्चन’ या नावाने ओळखतात. बिग बॉसनंतर किरण माने ‘रावरंभा’ चित्रपटातून तर ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT