Sindhutai Majhi Aai Serial: चिंधीची सिंधू झाली! ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत शिवानी सोनार साकारणार सिंधूताईंची भूमिका

Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi: ‘सिंधुताई माझी माई– चिंधी बनली सिंधु’ हे नवं पर्व १५ ऑक्टोबरपासून होणार सुरू असून सिंधुताईचे पात्र एक मराठमोळी अभिनेत्री साकरणार आहे.
Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi In Shivani Sonar
Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi In Shivani SonarInstagram

Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi In Sindhu

स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची सर्वत्र ‘अनाथांची माय’ अशी ओळख आहे. चित्रपटानंतर सिंधुताईंचा जीवनप्रवास प्रेक्षकांना मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. जीवनात करावा लागलेल्या अडथळींचा सामना, बालपणीचे किस्से असे अनेक मुद्दे आपण मालिकेतून पाहिले.

मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता प्रेक्षकांना लवकरच येत्या काही दिवसांत मोठी चिंधी पाहायला मिळणार आहे. मोठ्या चिंधीचे पात्राचे अनेक टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे पात्र कोण साकारणार हे आता उघडं झालं आहे.

Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi In Shivani Sonar
PM Modi On The Vaccine War: 'चित्रपट पाहून अभिमान वाटतो', PM मोदींनी ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या निर्मात्यांचं केलं कौतुक

१५ ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अवघ्या काही दिवसातच मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये छोटी चिंधी पाहिली, आता लवकरच प्रेक्षकांच्या समोर मोठी चिंधी दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या चिंधीचे पात्र कोण साकारणार?, याची चर्चा होताना दिसत आहे. पण अखेर या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळाले आहे. अनेकदा सोशल मीडियावर ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार मोठ्या चिंधीच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा होती. पण शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आता तिचेच नाव उघड झाले आहे.

अभिनेत्री शिवानी सोनारच्या मालिकेचा टीझर कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. हा टीझर शेअर करताना, “संसाराच्या जात्यावर दळता दळता वर्षं सरली, छोटीशी चिंधी आता मोठी झाली. पाहा नवे पर्व, ‘सिंधुताई माझी माई - चिंधी बनली सिंधु’, १५ ऑक्टोबरपासून सोम - शनि, संध्या. ७.०० वाजता ही मालिका कलर्स मराठीवर टेलिकास्ट होणार आहे. JioCinema या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही मालिका कधीही पाहू शकाल.” नव्या प्रोमोमध्ये शिवानी सोनार दिसत असून सिंधुताईंचे हे नवे पर्व १५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi In Shivani Sonar
Prarthana Behere Video: प्रार्थना बेहेरेच्या नवीन घराची झलक पाहिली का?, मुंबईपासून काही अंतरावर बांधला आलिशान बंगला

मालिकेत प्रमुख भूमिकेत प्रिया बेर्डे, अनन्या टेकवडे, किरण माने आणि योगिनी चौक हे कलाकार आहेत. प्रिया बेर्डेंनी सिंधुताईंच्या आजींचे, योगिनी चौकने सिंधुताईंच्या आईचे तर किरण मानेंनी सिंधुताईंच्या वडीलांचे पात्र साकारले.

Sindhutai Majhi Aai Gosht Chindhichi In Shivani Sonar
Sonu Sood: हेल्मेट तर घालावाच लागेल! सोनू सूद आणि मुंबई पोलिसांनी दुचाकीस्वारांना दिले फ्री हेल्मेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com