Kiran Mane Post: 'आपली लढाई स्वबळावर लढूया...' किरण माने यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देत केली खास पोस्ट

Kiran Mane : किरण मानेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठा आरक्षणाविषयी त्यांनी आपले मत मांडले आहे.
Kiran Mane Post
Kiran Mane PostSaam Tv
Published On

Kiran Mane On Maratha Aarakshan:

मराठा आरक्षणासाठी मागील काही महिन्यांपासून राज्यभरात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच उपोषण मागे घेतले आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला आरक्षणासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आता मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मराठी अभिनेते किरण माने पुढे आले आहेत.

राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापल आहे. यातच आता किरण माने यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. किरण मानेंनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठा आरक्षणाविषयी त्यांनी आपले मत मांडले आहे.

किरण माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून करत मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असं लिहलं आहे की, “मराठा बांधवांनो…आपल्या महामानवांनी कधीही दुसर्‍या समाजाला कमी लेखलं नाही. तुकोबारायांनी विठ्ठलामध्ये बुद्धाला पाहिलं. छत्रपती शिवरायांनी सिद्दी इब्राहीमला अंगरक्षक पद दिलं.

शाहूराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा विश्वरत्न घडवला! आरक्षणाला समर्थन देताना परजातीला कमी लेखणे किंवा भावनेच्या भरात कुणाची तुलना असामान्य महामानवांशी करून कटुता आणणे या गोष्टी त्वरित थांबवा. आपली लढाई स्वबळावर लढुया, कुणाला कमी लेखून नाही' असं किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहलं आहे.

Kiran Mane Post
Shah Rukh Khan Birthday :शाहरुख खानच्या वाढदिवशीच 'मन्नत'बाहेर चाहत्यांच्या मोबाइलची चोरी; पोलिसांकडून तिघांना अटक

किरण माने नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडत असतात. मध्यंतरी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असताना किरण मानेंनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली होती.

Kiran Mane Post
Urfi Javed News: उर्फी जावेदच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com