Urfi Javed News: उर्फी जावेदच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Urfi Javed News: पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी उर्फीच्या विरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Urfi Javed News
Urfi Javed NewsSaam tv
Published On

संजय गडदे

Urfi Javed News:

अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अभिनयापेक्षा अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. प्रसिद्धी मिळविण्यासाठी उर्फी जावेद नेहमीच नवनवे फंडे वापरत असते. आज देखील तिने अशाच प्रकारच्या एका नव्या फंड्याचा वापर केला. मात्र तिचा हा फंडा आता तिच्या चांगलाच अंगलट आल्याचे समोर आले आहे.

उर्फीने स्वतःला अटक करून घेतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी तिच्या विरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता उर्फी जावेदीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

आज सकाळी उर्फी जावेदने मुंबईच्या एका कॉफी शॉपमध्ये एक व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल माध्यमातून व्हायरल केला होता. या व्हिडिओमध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी उर्फीला अटक करताना दिसत आहे.

तसेच उर्फी त्यांच्याशी वाद घालत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. या व्हिडिओत शॉर्ट कपडे घातले म्हणून तिला मुंबई पोलिसांनी अटक केली, असा या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला होता. मात्र हा व्हिडिओ व्हायरल होताच उर्फीच्या फॅन्सने त्यावर प्रतिक्रिया देत चिंता देखील व्यक्त केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Urfi Javed News
Who Is Elvish Yadav: बिग बॉस विजेता, कोट्यवधींची संपत्ती, तरीही केली सापाच्या विषाची तस्करी? कोण आहे 'एल्विश यादव'

स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपल्या इतर तीन सहकाऱ्यांना पोलीस गणवेश वापरून उर्फीने एक रील बनवला. मात्र हा रील बनवताना उर्फी जावेद आणि तिच्या इतर चार सहकाऱ्यांकडून मुंबई पोलिसांविषयी सोशल माध्यमातून चुकीचा संदेश गेला,

उर्फीचा व्हिडिओ लोकांना खरा वाटला, त्यामुळे संपूर्ण देश आणि जगात महिलांनी अपुरे कपडे घातल्याने मुंबई पोलीस अटक करतात, असा संदेश गेल्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली, यामुळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Urfi Javed News
Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' फेम पाठकबाईंचे कमबॅक; लवकरच नवीन चित्रपटात झळकणार

तसेच दोन महिला व एक पुरुषांनी पोलीस नसताना फसवणूक करण्याच्या उद्देशाने पोलिसांचा गणवेश परिधान करून पोलीस असल्याचे भासवले म्हणून उर्फी जावेद आणि तिच्या इतर चार साथीदारांविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलम 171,419,500,34 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा पोलीस उर्फी जावेद आणि तिच्या चार साथीदारांना कधीही चौकशीसाठी बोलवून अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com