Bigg Boss 19 saam tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'च्या विजेत्याला ट्रॉफीसह किती रक्कम मिळणार? टॉप ३ मध्ये 'या' नावांची चर्चा

Bigg Boss 19-Winner Prize Money : 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 'बिग बॉस १९'च्या विजेत्याला किती रक्कम मिळणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले थाटात रविवारी पार पडणार आहे.

'बिग बॉस १९'ला टॉप ५ स्पर्धक भेटले आहेत.

'बिग बॉस १९'च्या विजेत्याला ट्रॉफीसोबत मोठी रक्कम देखील मिळणार आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होस्ट करत असलेला रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 19' आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे. तीन महिने हा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला आणि प्रवासाचा आनंद घेतला आहे. मात्र येत्या रविवारी 'बिग बॉस 19' चा धमाकेदार ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे 'बिग बॉस 19' ची ट्रॉफी कोण उचलणार, विजेत्याला किती रुपयांचे बक्षीस मिळणार याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसच्या घरात टॉप 5 स्पर्धकांचा प्रवास दाखवण्यात येत आहे. जो पाहून स्पर्धक आणि चाहते भावुक झाले आहेत.

'बिग बॉस 19'च्या विजेत्याला बक्षीस काय मिळणार?

'बिग बॉस 19' च्या विजेत्याला सुंदर मोठी चमकदार 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी मिळणार आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'च्या विजेत्याला तब्बल 50 कोटी रुपये मिळणार असल्याचे बोले जात आहे. 'बिग बॉस 18' चा विजेता करणवीर मेहरा देखील 50 लाख रुपये मिळाले होते.

'बिग बॉस 19'चे टॉप 5 स्पर्धक

  1. गौरव खन्ना

  2. प्रणित मोरे

  3. फरहाना भट्ट

  4. अमाल मलिक

  5. तान्या मित्तल

सोशल मीडियावर 'बिग बॉस 19'ची माहिती देणाऱ्या पेजानुसार टॉप 3 स्पर्धकांमध्ये पहिल्या नंबरवर गौरव खन्ना आणि बाकी दोनमध्ये प्रणित मोरे आणि फरहाना भट्ट यांची नावे आहेत. आता 'बिग बॉस 19'चा विजेता नेमका कोण होणार, याचा रविवारी खुलासा होईल.

ग्रँड फिनाले कुठे अन् कधी पाहता येणार?

सलमान खानचा शो 'बिग बॉस 19' चा ग्रँड फिनाले 7 डिसेंबर रोजी रात्री 9.00 वाजता जिओ सिनेमा आणि डिस्ने+ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. तसेच कलर्स टीव्हीवर रात्री 10:30 वाजता पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सासरच्या जाचाला कंटाळून सूनेचा घर सोडण्याचा निर्णय; पती आणि नणंदेनं क्रूरतेनं संपवलं

Wight Loss: 1 जानेवारीपासून डाईट प्लॅन करताय? मग, डाईट करताना काब्सचे हे पदार्थ टाळण्याचा करा प्रयत्न

Maharashtra Live News Update: २४ तासांत युतीवर निर्णय नाही घेतला तर स्वतंत्र निर्णय घेऊ – प्रताप सरनाईक यांचा भाजपाला अल्टिमेटम

Electricity Prices: देशभरात वीज होणार स्वस्त; पावर ट्रेडिंग शुल्काबाबत केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचा मोठा निर्णय

Onion Rings Recipe: 31thसाठी बनवा कोल्ड ड्रिंकसोबत खायचे टेस्टी आणि क्रिस्पी ऑनियन रिंग्स, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT