Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानची गगन भरारी! कला विश्वातील मोठ्या पुरस्कारानं गौरवलं, म्हणाली - "उरी विश्वास बाळगून..."

Tejashri Pradhan Achievement : मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधानला कला विश्वातील मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर तिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Tejashri Pradhan Achievement
Tejashri Pradhansaam tv
Published On
Summary

अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

तेजश्रीला कला विश्वातील मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले आहे.

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती स्वानंदीच्या भूमिकेत झळकली आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मराठी अभिनेता सुबोध भावेसोबत ती मालिकेत दिसत आहे. तेजश्री प्रधानला 'होणार सून मी ह्या घरची' मधून खूप लोकप्रियता मिळाली. अशात तिच्या कामाची पोचपावती तिला मिळाली आहे.

तेजश्री प्रधानला कला विश्वातील मोठ्या पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. नुकताच तिला ''राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकारल्यावर तिने एक खास भावनिक पोस्ट केली आहे. तिने पोस्टमध्ये पुरस्कार घेतानाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिला हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिष शेलार यांच्या हस्ते मिळाला.

तेजश्री प्रधान पोस्ट

"आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे ! यशासकट अन् अपयशासकट...न थकता...न डगमगता... उरी विश्वास बाळगून...की जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो ! ते सर्व वेचत चालत राहणे...आणि मग, एक छानसा विसावा... त्यात थोडा आढावा! करून ठेवलेल्या गोष्टींचा... चुकांचा...बरोबर गोष्टींचा...मायबाप प्रेक्षकाच्या प्रेमाचा...टिकेचा...आपुलकी दाखवणाऱ्या सह कलाकारांचा... हितचिंतकांचा आणि निंदकांचा... मग, अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं, "आमचं लक्ष आहे... तुमच्या वाटचालीवर" आणि मग, मन पुन्हा नव्या जोमाने विश्वासाने पुढे चालू लागतं... पुन्हा एकदा!

ह्या वेळी हे कोणीतरी फार महत्त्वाचे आहे माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासासाठी... महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४... महाराष्ट्र शासनाचे आणि माननीय मंत्री, सांस्कृतिक कार्य, माननीय अॅड. आशिष शेलार यांचे खूप खूप आभार या केलेल्या सन्मानासाठी..."

तेजश्री प्रधानचे तिने मिळवलेल्या या यशामुळे चाहते आणि कलाकारांकडून कौतुक होताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिच्या कामाचे कौतुक केले आहे.

Tejashri Pradhan Achievement
Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन, प्रसूतीदरम्यान घेतला अखेरचा श्वास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com