Famous Influencer Death : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचं निधन, प्रसूतीदरम्यान घेतला अखेरचा श्वास

Pyari Maryam Passed Away : लोकप्रिय इन्फ्लुएन्सरचे निधन झाले आहे. बायकोच्या मृत्यूने नवऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकं काय झालं, जाणून घेऊयात.
Pyari Maryam Passed Away
Famous Influencer Deathsaam tv
Published On
Summary

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे निधन झाले आहे.

इन्फ्लुएन्सरने प्रसूतीदरम्यान अखेरचा श्वास घेतला.

मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि टिकटॉक स्टार प्यारी मरियम (Pyari Maryam) चे निधन झाले आहे. प्रसुतीदरम्यान इन्फ्लुएन्सरने अखेरचा श्वास घेतला आहे. यात तिच्या दोन्ही जुळ्या बाळांचे देखील निधन झाले आहे. इन्फ्लुएन्सरच्या अशा अचानक निधनामुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्यारी मरियम आई होणार होती त्यामुळे तिच्या घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र तिच्या मृत्यूने नवऱ्याला मोठा धक्का बसला आहे. प्यारी मरियम आणि तिचा नवरा सोशल मीडियावर व्हिडीओ बनवायचे. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या कठीण काळात मरियमच्या कुटुंबासोबत तिचे चाहते उभे आहेत. तिच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना ते करत आहेत. प्यारी मरियमच्या अशा जाण्याने कंटेंट क्रिएटर्सना मोठा धक्का बसला आहे.

प्यारी मरियम कोण?

प्यारी मरियम ही पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. तिचे लग्न इन्फ्लुएन्सर अहसान अली यांच्यासोबत झाले होते. प्रसूतीदरम्यान प्यारी मरियमची तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही ती आणि तिच्या जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्यारी मरियमच्या सुरेल आवाजाचे चाहते दिवाने होते. तिचा इन्स्टाग्रामवर मोठा फॅन फॉलोइंग आहे.

प्यारी मरियमने अलिकडेच आपल्या प्रेग्नेंसी न्यूज चाहत्यांना दिली होती. ती आपला प्रेग्नेंसीचा काळ मस्त आनंदात घालवताना दिसत होती. तिला नवरा खूप पाठिंबा द्यायचा. आयुष्यातील नवीन आनंद साजरा करायला दोघेही खूपच खुश होते.

Pyari Maryam Passed Away
Palak Muchhal : स्मृती मानधना-पलाश मुच्छलच्या लग्नाबद्दल महत्त्वाची अपडेट, बहीण पलक मुच्छल काय म्हणाली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com