Gaurav Khanna saam tv
मनोरंजन बातम्या

Gaurav Khanna : बाई काय हा प्रकार! 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी जिंकूनही गौरव खन्नाला कार मिळाली नाही, पाहा VIDEO

Gaurav Khanna Video : 'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्नाला अद्याप शोमध्ये जिंकलेली कार मिळाली नाही. याचा खुलासा त्याने आपल्या व्लॉगमध्ये केला आहे.

Shreya Maskar

गौरव खन्नाने 'बिग बॉस 19'चे विजेते पद पटकावले आहे.

गौरव खन्ना हा टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे.

गौरव खन्नाला अद्याप शोमध्ये जिंकलेली कार मिळाली नाही.

'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्ना सध्या सोशल मीडियावर चांगला सक्रिय आहे. 'अनुपमा' मालिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. गौरव खन्नाला 'बिग बॉस 19' जिंकून जवळजवळ एक महिना झाला आहे. बिग बॉसनंतर गौरव खन्नाने स्वतःचा यूट्यूब चॅनेल सुरू केले. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात 'बिग बॉस 19' संबंधित अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे.

गौरव खन्नाने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याने आपल्या करिअरचा प्रवास सांगितला आहे. ज्यात 'अनुपमा' आणि 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' यांच्या प्रवासाचा उल्लेख आहे. तसेच त्याच्या व्हिडीओत प्रणित मोरे देखील पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये गौरव खन्नाने खुलासा केला की, शोमध्ये जिंकलेली कार त्याला अद्याप मिळाली नाही. यावर गौरव आणि प्रणितमध्ये चांगले बोलणे देखील होते.

गौरव खन्ना रिलायन्स फॅमिली शोचे होस्टिंग करणार आहे. जो दरवर्षी धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो. व्हिडीओत गौरवने कार्यक्रमाचे आयोजनाची एक झलक दाखवली आहे. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की, गौरव प्रणितला मिठाई देतो. तेव्हा प्रणित मजेत म्हणतो की, "मिठाई नको, 'बिग बॉस'मध्ये जिंकलेली कारच भेट दे." यावर गौरव हसत म्हणतो, "ती कार अजून मलाच मिळालेली नाही..." यावरून समजते की, गौरव खन्नाला 'बिग बॉस 19'ची कार मिळाली नाही.

गौरव खन्नाला 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीसोबत 50 लाख रुपये मिळाले आहेत. तसेच एक आलिशान कार मिळणार होती. 'बिग बॉस'चा 19 वा सीझन खूप गाजला. प्रेक्षकांनी सीझनला खूप प्रेम दिले. आता लवकरच 'बिग बॉस मराठी 6' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचे होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate News: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी पडझड; भाव घसरल्याने बाजारात उलटफेर, 24K, 22K,18K तोळ्याची किंमत किती?

Heart health: रात्री उपाशी पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

धक्कादायक! पायाने तुडवलेला मैदा थेट ताटात? 'त्या' व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ; FDA प्रशासनावर संताप

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

गोळ्या- औषधांचा खर्च वाचेल! रोज फक्त १ लवंग खाल्ल्याने शरीरात होतील ५ आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT