सलमान खानचा 'बिग बॉस 19' शो नुकताच सुरू झाला आहे.
'बिग बॉस 19'मध्ये गायक अमाल मलिकची धमाकेदार एन्ट्री झाली आहे.
भावाच्या बिग बॉसमधील सहभागावर अरमान मलिकने प्रतिक्रिया दिली आहे.
'बिग बॉस 19'मध्ये (Bigg Boss 19) लोकप्रिय गायक अमाल मलिक (Amaal Mallik) सहभागी झाला आहे. आजवर त्याने आपल्या गाण्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता मात्र तो बिग बॉसच्या घरात आला आहे. ज्यामुळे अमाल मलिकचे चाहते खूप खुश आहेत. मात्र कुटुंबातील सदस्य नाराज असल्याचे दिसत आहे. अमाल मलिक भाऊ अरमान मलिक (Armaan Malik) देखील एक उत्तम गायक आहे. नुकतीच त्याने आपल्या भावाच्या 'बिग बॉस 19'मधील एन्ट्रीवर आपले मत मांडले आहे.
अरमान मलिकला एका चाहत्याने सोशल मीडियावर विचारले की, "अमाल मलिक बिग बॉसमध्ये गेलाय, यावर तुमची प्रतिक्रिया काय?" यावर उत्तर देत अरमान मलिक म्हणाला, "तो शो त्याच्यासाठी नाही आहे...पण आता अमाल भाईला कोण समजावणार...असो, बोर्डिंग स्कूल समजून थोडे दिवस मस्ती करून परत घरी येऊ दे...खूप गाणी बनवायची बाकी आहेत..."
अरमान मलिकने भावासाठी दिलेली ही रिएक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. खरं तर अमाल मलिकच्या 'बिग बॉस 19'मधील एन्ट्रीमुळे नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता बिग बॉसच्या घरात अमाल मलिक कसा खेळतो, कोणता राडा घालतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच प्रेक्षक अमाल मलिकचा गेम पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
नुकतेच 'बिग बॉस 19'च्या घरातील पहिले एलिमिनेशन पार पडले असून फरहान भटला (Farhana Bhatt ) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बिग बॉसमधून फरहान भटची एक्झिट झाली आहे. घरातील सदस्यांनी एकत्र मिळून फरहान भटला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 19' शो आता सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता जिओ हॉटस्टार आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टिव्हीवर पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 19'ची यंदाची थीम राजकारणावर आधारित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.