जगभरात गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
गणपतीच्या आगमनाला भन्नाट गाणी वाजवा आणि बाप्पाचे स्वागत करा.
सोशल मीडियावर सुपरहिट असलेली गणपतीच्या गाण्यांची आजच प्ले लिस्ट ठरवा.
गणपतीच्या आगमनाला काही तास बाकी आहेत. गणपतीचे आगमन ढोल ताशांच्या गजरात करा. तसेच सोबतीला सुपरहिट गाण्यांची जोड ठेवा आणि बेभान होऊन नाचा. गणपती हा सण आनंदाचा, भक्तीचा आणि उत्सवाचा आहे. 11 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण अनुभवता येतो. गाण्याच्या तालावर भाविक नाचू लागतात. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सुपरहिट 10 गाण्यांची प्ले लिस्ट (Ganpati Song) आताच सेव्ह करून ठेवा.
'दगडी चाळ' चित्रपटातील 'मोरया मोरया' गाणे खूप प्रसिद्ध आहे. ढोल ताशांच्या गजरात या गाण्यावर तुम्ही भन्नाट डान्स करू शकता.
गणपतीत आवर्जून वाजवले जाणारा गाणे म्हणजे, 'पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा...' या गाण्याने मंगलमय वातावरण तयार होते.
'व्हेंटिलेटर' चित्रपटातील 'या रे या सारे या' गाण्याचे बोल ऐकताच आपण गणेश भक्तीत तल्लीन होते. गाण्यांच्या शब्दांत प्रत्येकाच्या भावना व्यक्त झाल्या आहेत.
गणपतीच्या आगमनाला 'ताशाचा आवाज तरर झाला गणपती माझा नाचत आला...' हे गाणे आवर्जून वाजवा आणि भक्तीत बेभान होऊन नाचा.
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांना हे गाणे खूप आवडते.
गणपतीच्या सुंदर रुपाचे वर्णन करणारे गाणे म्हणजे 'अशी चिक मोत्याची माळ...' गणपतीच्या आरतीनंतर हे गाणे लावून मंगलमय वातावरण बनवा.
ABCD चित्रपटातील 'शंभू सुताय' गाणे ऐकताच अंगावर काटा येतो. या गाण्यात खूप सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते. तसेच भन्नाट डान्स देखील करता येतो.
गणेशोत्सवात आवर्जून वाजवले जाणारे गाणे म्हणजे 'गणपती राया पडते मी पाया...' या गाण्यातून गणपती बाप्पा प्रतिची माया, प्रेम आणि भक्ती व्यक्त होते.
'लोकमान्य: एक युगपुरुष' चित्रपटातील 'गजानना गजानना' गाणे खूप प्रसिद्ध आहे. हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'विरुध्द' चित्रपटातील 'श्रीगणेशाय धीमही' गाणे तुमच्या गणपतीच्या गाण्यांच्या यादीत असायलाच हवे. हे गाणे आजही खूप प्रसिद्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.