Atharva Sudame : अथर्व सुदामेने वादग्रस्त रीलवर मागितली माफी, नेमकं काय म्हणाला? पाहा VIDEO

Atharva Sudame Apologized : गणशोत्सवनिमित्त शेअर केलेल्या व्हिडिओवर आता अथर्व सुदामेने जाहीर माफी मागितली आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Atharva Sudame Apologized
Atharva Sudame SAAM TV
Published On
Summary

अथर्व सुदामेने गणशोत्सवनिमित्त सोशल मीडियावर एक रील शेअर केली.

या रीलमुळे अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात अडकला.

आता अथर्व सुदामेने सर्वांची माफी मागितली आहे.

मराठमोळा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे (Atharva Sudame ) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रीलमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याने गणेशोत्सवानिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओतून अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात अडकला. अथर्व सुदामेला रीलमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

अथर्व सुदामेला धमक्याही देण्यात आल्या होत्या. तू अक्कल शिकवू नको, असा इशारा ब्राह्मण महासंघाने दिला होता. ज्यामुळे त्याने ती रील डिलीट देखील केली. आता या प्रकरणी अथर्व सुदामे याने जाहीर माफी मागितली आहे. ज्याचा व्हिडीओ देखील खूप व्हायरल होत आहे. तो नेमंक काय म्हणाला, जाणून घेऊयात.

अथर्व सुदामे माफी मागत म्हणाला की, "नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे...काल मी एक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ टाकली होती. ती मी दुपारी डिलीट केली. त्या व्हिडीओमुळे बरेच लोक नाराज झाले आहेत. त्यांना ती व्हिडीओ आवडली नाही आहे. माझा कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. मी आतापर्यंत अनेक असे व्हिडीओ केले आहेत जे आपल्या हिंदू सणांवर, मराठी संस्कृतीवर, मराठी भाषेवर आहेत. मला असं वाटत नाही की, माझ्याएवढं कोणत्याही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने आपल्या सणांवर,संस्कृतीवर व्हिडिओ केले आहेत. त्यामुळे माझ्या मनात कोणालाही दुखावण्याचा उद्देश नव्हता. तरी तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो. आतापर्यंत तुम्ही जसे माझ्यावर प्रेम केले तसेच करत रहा. "

नेमकं प्रकरण काय?

अथर्व सुदामे याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओत असे दाखवण्यात आले होते की, अथर्व सुदामे एका मूर्तिकाराकडे गणपतीची मूर्ती खरेदी करायला जातो. मात्र तो मूर्ती विकणारा माणूस मुस्लिम धर्माचा असतो. तरीही अथर्व सुदामे त्याच्याकडून गणपतीची मूर्ती खरेदी करतो.

Atharva Sudame Apologized
'Bigg Boss 19'ची धमाकेदार सुरूवात; पहिल्याच दिवशी सदस्यांनी घातला तुफान राडा, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com