गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला आली आहे.
गणेशोत्सवात आवर्जून गणपतीवर आधारित चित्रपट पाहा.
सध्या सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे.
जगभरात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक लोक गावाकडे गेले आहेत. यंदा गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला आली आहे. वर्षभर सर्वजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. 11 दिवस भाविक गणपतीच्या भक्तीत तल्लीन होतात. गणेशोत्सवातही मनोरंजनाचा मेजवानी चाखण्यासाठी गणपती स्पेशल चित्रपट आवर्जून पाहा. चित्रपटांची यादी आताच नोट करा.
1979 साली 'अष्टविनायक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात मराठी अभिनेते सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत झळकले आहेत.अष्टविनायक' चित्रपट ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत.
1999 मध्ये 'वास्तव' चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटात अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. 'वास्तव' चित्रपट तुम्हाला घरबसल्या सोशल मीडियाच्या मदतीने पाहता येईल.
2007 साली 'बाल गणेश' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात गणपतीच्या छोट्या कथा दाखवल्या आहेत. लहान मुलांना हा चित्रपट खूप आवडतो.
2011साली 'मोरया' चित्रपट रिलीज झाला. आजही चित्रपटाची गाणी सुपरहिट आहेत. या चित्रपटाला गणेशोत्सवाची पार्श्वभूमी आहे. 'छावा' फेम मराठी अभिनेता संतोष जुवेकर या चित्रपटात आहे.
हृतिक रोशनचा 'अग्निपथ' चित्रपट 2012 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. अजय-अतुलने गायलेले 'देवा श्री गणेशा' गाणे आजही खूप प्रसिद्ध आहे.
2015 ला वरुण धवन आणि श्रद्धा कपूरचा ABCD 2 रिलीज झाला. या चित्रपटातील 'हे गणराया' गाणे खूप प्रसिद्ध झाले.
2024मध्ये 'घरत गणपती' चित्रपट रिलीज झाला आहे. यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'घरत गणपती' चित्रपट री-रिलीज करण्यात येणार आहे. 29 ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 'घरत गणपती' पाहता येईल.
2015ला 'लोकमान्य: एक युगपुरुष' हा लोकप्रिय चित्रपट रिलीज झाला. चित्रपटात शंकर महादेवन यांनी गायलेले 'गजानना गजानना' गाणे खूप प्रसिद्ध झाले. गणेशोत्सवात हे गाणे वाजवले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.