Manache Shlok: पर्वतांच्या कुशीत सुरू होणार प्रेम प्रवास; 'मना’चे श्लोक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Manache Shlok Marathi Movie: आयुष्याचा प्रवास, नाती आणि पर्वतांच्या कुशीत उमलणारं प्रेम अशा वेगळ्या संकल्पनेवर आधारित ‘मना’चे श्लोक’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Manache Shlok Marathi Movie
Manache Shlok Marathi MovieSaam Tv
Published On

Manache Shlok Marathi Movie: आयुष्य हा एक प्रवास आहे, कधी सोपा, कधी कठीण, तर कधी भावनांनी भरलेला. या प्रवासाला पर्वतांची साथ आणि मनाच्या नात्यांची ऊब मिळाली तर तो प्रवास खास ठरतो. याच आयुष्याचा प्रवास, नाती आणि पर्वतांच्या कुशीत उमलणारं प्रेम अशा वेगळ्या संकल्पनेवर आधारित ‘मना’चे श्लोक’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात मनवा आणि श्लोक या दोन व्यक्तिरेखांचा भावनिक आणि तितकाच रंजक प्रवास दाखवण्यात आला आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये हे दोघे पर्वतरांगांकडे निघालेलं दिसत असून, त्यांचे पाठमोरे रूप प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच चाळवत आहे.

Manache Shlok Marathi Movie
Bigg Boss 19: बिग बॉसमध्ये 'या' स्पर्धकाच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षक नाराज; दिला पहिलं एलिमिनेट करण्याचा सल्ला

चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब यांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी स्वतः केलं आहे.

Manache Shlok Marathi Movie
Salman Khan: सलमान खानने अजून लग्न का केलं नाही? बिग बॉसमध्ये स्वत:च सांगितलं खरं कारणं

मना’चे श्लोक’ हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, श्रेयश जाधव आणि संजय दावरा यांनी त्याची निर्मिती केली आहे. स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com