Salman Khan: सलमान खानने अजून लग्न का केलं नाही? बिग बॉसमध्ये स्वत:च सांगितलं खरं कारणं

Salman Khan Marriage: रविवारपासून सलमान खानचा 'बिग बॉस १९' हा शो सुरू झाला आहे. या शो दरम्यान, अभिनेत्याने आतापर्यंत लग्न का केल नाही याचं कारण त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे.
Salman Khan Marriage
Salman Khan MarriageSaam Tv
Published On

Salman Khan Marriage: टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसचा १९ वा सीझन सुरु झाला आहे. रविवारी, या शोचा प्रिमियर झाला आणि १६ स्पर्धकांनी प्रवेश या शोमध्ये प्रवेश केला, तर ३ स्पर्धक वाइल्ड कार्ड म्हणून प्रवेश करतील. शोमधील स्पर्धकांच्या परिचयादरम्यान, होस्ट आणि अभिनेता सलमान खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा करत त्यांने आतापर्यंत लग्न का केले नाही याचे कारण सांगितले.

'गँग्स ऑफ वासेपूर' पाहिला आहे का?

बिग बॉस १९ च्या प्रीमियर एपिसोड दरम्यान, सलमान खानने कंटेंट क्रिएटर तान्या मित्तलचे स्पर्धक म्हणून स्वागत केले. त्यानंतर अभिनेत्याने तिची ओळख 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटात पटकथालेखनाचे काम करणाऱ्या झीशान कादरीशी करून दिली. या दरम्यान, सलमानने तान्याला विचारले की तिने 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपट पाहिला आहे का, ज्याला तिने नाही म्हटले. त्यानंतर अभिनेत्याने तिला विचारले की तिला कोणत्या प्रकारचे चित्रपट पहायला आवडतात. उत्तरात, तान्या म्हणाली की तिने 'प्रेम रतन धन पायो' पाहिला आहे.

Salman Khan Marriage
Parineeti Chopra: परिणीती चोप्रा-राघव चड्ढाच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

सलमान खान म्हणाला- मला खरे प्रेम माहित नाही

या दरम्यान तान्याने सलमान खानला विचारले, 'सर, खरे प्रेम नेहमीच अपूर्ण असते का?' यावर सलमानने उत्तर दिले, 'खरे प्रेम, मला माहित नाही, कारण खरे प्रेम अजून मला झाले नाही. त्यामुळे याबद्दल मला काही कल्पना नाही.

Salman Khan Marriage
Aranya: 'जंगलाची दाट हिरवाई आणि भीतीदायक शांतता...'; नात्यांच्या संघर्षाची कथा उलगडणार, 'अरण्य' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सलमान खानचे प्रेमप्रकरण

सलमान खान आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. अभिनेता ऐश्वर्या रायला तीन वर्षे डेट करत असल्याचे वृत्त आहे. दोघे पहिल्यांदा १९९९ मध्ये 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर भेटले होते, परंतु २००२ पर्यंत ते वेगळे झाले होते. याशिवाय, अभिनेत्याने संगीता बिजलानी, कतरिना कैफ, युलिया वंतूर यांसारख्या अभिनेत्रींनाही डेट केले आहे. तरीही अभिनेत्याने खऱ्या प्रेमाबद्दल केलेले हे विधान नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करणारे आहे.

बिग बॉस १९ शो बद्दल

बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १९ व्या सीझन सलमान खान होस्ट करत आहे. अभिनेत्याने बिग बॉस १९ च्या स्पर्धकांची ओळख एका भव्य पद्धतीने करून दिली. या शोमध्ये अशनूर कौर, झीशान कादरी, तान्या मित्तल, नगमा मिराजकर, अवेज दरबार, नेहल चुडासमा, अभिषेक बजाज, बसीर अली, गौरव खन्ना, नतालिया जानोस्झेक, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, नीलम गिरी, कुनिका सुदानंद, अमल मलिक आणि मृदुल तिवारी आदि कलाकार दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com