Shreya Maskar
मुंबईतील लालबागचा राजा हा जगातील एक जगप्रसिद्ध गणपती आहे.
लालबागचा राजा 'नवसाला पावणारा गणपती' म्हणून ओळखला जातो.
चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पा आहे. याच्या दर्शनासाठी मोठी रांग पाहायला मिळते.
गणेश गल्लीचा गणपती 'मुंबईचा राजा' म्हणून ओळखला जातो.
गिरगावमधील खेतवाडीचा गणराज म्हणजे खेतवाडीचा राजाची भव्य मूर्तीं पाहून डोळे दिपतात.
परळ येथील नरे पार्कचा गणपती म्हणजेच प्रसिद्ध परळचा राजा होय.
गणेशोत्सवाचे 11 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण आणि भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांतून भाविक येतात.