Armaan Malik Wedding : तू ही मेरा घर!अरमान मलिक चढला बोहल्यावर, पहा कोणासोबत केलं लग्न

Armaan Malik Wedding : प्रसिद्ध गायक अरमान मलिकने २ जानेवारी रोजी एका खासगी समारंभात त्याच्या लॉन्ग टर्म गर्लफ्रेंड सोबत लग्न केले आहे. त्याच्या लग्नानंतर चाहते त्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
Armaan Malik Weeding
Armaan Malik WeedingInstagram
Published On

Armaan Malik Wedding : प्रसिद्ध गायक अरमान मलिकने लॉन्ग टर्म गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत एका खाजगी समारंभात लग्न केले. 29 वर्षीय गायकाने त्याचे कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. अरमानने इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.,

या फोटोमध्ये नवविवाहीत जोडप्याने पीच रंगाचे पोशाख परिधान केलेले दिसत आहेत. फोटो पोस्ट करत असमानने कॅप्शनमध्ये लिहिले, "तू ही मेरा घर", जे त्याच्या नवीनतम संगीत सिंगलचे शीर्षक देखील आहे. नवविवाहित जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री सोफी चौधरीने लिहिले, "ओह माय गॉड! तुमचे अभिनंदन! गॉड ब्लेस यू." "माझे हृदय खूप भरले आहे, मी रडत आहे," एका चाहत्याने टिप्पणी दिली. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "आनंदाचे अश्रू."

Armaan Malik Weeding
Karan Johar : मिशन ₹ 5000 कोटी! पुष्पा २, RRR ला सुद्धा मागे टाकणार; करण जोहरचा जबरदस्त प्लान?

आशना आणि अरमान दोघेही 2017 पासून एकमेकांना डेट करत आहेत, या कपलने ऑगस्ट 2023 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले आणि ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांनी साखरपुडा केले. आशना ही सोशल मिडीया इन्फ्लुएंसर असून तिचे १ मिलियन फॉलोवर्स आहेत. यासह आशनाचा द स्नॉब होम हा होम डेकॉरचा ब्राण्ड चालवते.

Armaan Malik Weeding
Alia Bhatt : आलिया भट्ट आणि राहाच्या 'त्या' फोटोची चर्चा; चाहते म्हणाले, 'नववर्षी मायलेकी...'

2024 मध्ये, अरमानने एड शीरन सोबत झालेल्या मुंबईच्या कॉन्सर्टमध्ये स्टेज शेअर केला. यावेळी त्यानेअतिशय लोकप्रिय रोमँटिक गीत सादर केली. तर, काही नविन गाणी रिलीज केली. अरमान मलिक प्रसिद्धीझोतात येण्याचे आणखी एक कारण म्हणजे सोशल मीडियावर त्याचा चाहत्यांवर असलेला प्रभाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com