Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Bigg Boss 19-Second Week Eviction: बिग बॉसच्या घरात आज 'वीकेंड का वार' पाहायला मिळणार आहे. सलमान खानने एलिमिनेशनबद्दल मोठा धक्का स्पर्धकांना दिला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 19'मध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे.

बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात एलिमिनेशन होणार नाही.

मीडिया रिपोर्टनुसार,अवेज दरबारला सर्वात कमी मते मिळाली आहेत.

आज (6 सप्टेंबर) शनिवार बिग बॉसच्या (Bigg Boss 19) घरात 'वीकेंड का वार' पाहायला मिळणार आहे. सलमान खान अमाल मलिकची शाळा घेणार आहे. तर काही स्पर्धकांचे कौतुक करणार आहे. 'वीकेंड का वार' खूपच मनोरंजक होणार आहे. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या आठवड्यात पाच स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.

नॉमिनेट सदस्य

  • अवेज दरबार

  • मृदुल तिवारी

  • कुनिका सदानंद

  • तान्या मित्तल

  • अमाल मलिक

'वीकेंड का वार'मध्ये सलमान खान नवीन ट्विस्ट घेऊन येणार आहे. ज्यामुळे स्पर्धकांना मोठा धक्का बसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19'च्या दुसऱ्या आठवड्यातही एलिमिनेशन होणार नाही आहे. मीडिया रिपोर्टनुसार,अवेज दरबारला सर्वात कमी मते मिळाली आहेत. कोणताच सदस्य घराबाहेर जाणार नसून उलट घरात एका स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. ज्यामुळे बिग बॉसच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मात्र अद्याप एलिमिनेशनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

वाइल्ड कार्ड एन्ट्री

'बिग बॉस 19'च्या घरात दुसऱ्याच आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 19' च्या घरात शाहबाज बदेशाची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. शाहबाज बदेशा हा अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ आहे. आज 'वीकेंड का वार' मध्ये शाहबाज बदेशा 'बिग बॉस' च्या घरात एन्ट्री करणार असल्याचे बोले जात आहे. मात्र अद्याप 'बिग बॉस' कडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT