Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Bigg Boss 19 Update : बिग बॉसच्या घरात नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. घराचा नवीन कॅप्टन कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

फरहाना 'बिग बॉस 19'च्या घरात दोन आठवडे कॅप्टन होती.

नुकताच घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे.

कॅप्टन्सी टास्कमध्ये फरहाना आणि मालतीमध्ये मोठे भांडण होते.

'बिग बॉस 19'च्या (Bigg Boss 19) घरात कॅप्टन्सी टास्क पार पडला आहे. यात घरात आलेल्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने म्हणजे मालती चहरने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून फरहाना भट्ट बिग बॉसच्या घराची सूत्रे सांभाळली होती. पण आता नवीन कॅप्टन ठरवण्यात आला आहे. फरहाना पूर्वी कुनिका सदानंद, अमाल मलिक, अभिषेक बजाज हे कॅप्टन राहिले आहेत.

कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धकांच्या दोन दोन जोड्या बनवण्यात आल्या होत्या. त्यांना स्वतःचे फाटलेले फोटो पुन्हा तयार करायचा होते. मात्र यात एक ट्विस्ट होता. तो म्हणजे विरोधी स्पर्धक या कामात अडथळे निर्माण करताना दिसला. सदस्यांनी एकमेकांचे फोटो खराब केले. कॅप्टन्सी टास्कचा संचालक अभिषेक बजाज होता. कॅप्टन्सी टास्क दरम्यान नीलम-नेहल आणि मालती-फरहानामध्ये मोठी भांडणे झाली.

'बिग बॉस 19'च्या घरात या आठवड्यात कॅप्टन्सीच्या शर्यतीत नेहलने बाजी मारली आहे. नेहल घराची नवीन कॅप्टन बनली आहे. आता नेहलच्या राज्यात घरात कोणते धुमाकूळ होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात सहा सदस्य नॉमिनेट झाल आहेत. ज्यात जीशान कादरी, नीलम गिरी,मृदुल तिवारी, बसीर अली, अशनूर कौर आणि प्रणित मोरेचा समावेश आहे.

तान्या मित्तल, अभिषेक बजाजनंतर मालती चहर मृदुल तिवारीसोबत भांडताना दिसते. आता 'वीकेंड का वार'मध्ये बिग बॉसच्या घरातून कोण जाणार? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच सलमान खान कोणाची शाळा घेणार आणि कोणाचे कौतुक करणार? हे देखील पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Bajpayee: मनोज बाजपेयी झाला मुळशीकर, पुण्यात खरेदी केली ५ एकर जमीन, तब्बल ‘इतक्या’ कोटीत

Maharashtra News Live Update: बाभुळगांव वरून आंदोलक विद्यार्थी अमरावतीसाठी रवाना

Shocking : "..तू पण माझ्यावर प्रेम कर" एकतर्फी प्रेमातून तरुणीने संपवले आयुष्य; सांगलीतील धक्कादायक घटना

8th Pay Commission: ₹18,000 वरून पगार थेट ₹72,000? 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या संपूर्ण गणित

Famous Actor : मृत्यूच्या दाढेतून परतला प्रसिद्ध अभिनेता! "काही तासांपूर्वी आम्ही तिथेच होतो..." सांगताना अंगावर आला काटा

SCROLL FOR NEXT