Bigg Boss 19 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 19 : "नेक्स्ट टाइम कपड़े पहनकर..."; मालती चाहरचं नेहलबद्दल आक्षेपार्ह विधान, सलमान खान कोणती शिक्षा देणार?

Bigg Boss 19 Update : बिग बॉसच्या घरात मालती चाहर आणि नेहलमध्ये मोठे भांडण झाले आहे. मालती नेहलबद्दल आक्षेपार्ह विधान करते. ज्यामुळे घरातील सदस्यांना मोठा धक्का बसतो.

Shreya Maskar

बिग बॉसच्या घरात नुकताच रेशन टास्क पार पडला आहे.

मालती चहरने रेशन टास्क दरम्यान केलेल्या चुकीमुळे बिग बॉसने घरातील रेशन कापले.

बिग बॉसच्या घरात मालती चाहरने नेहलबद्दल आक्षेपार्ह विधान केले.

'बिग बॉस 19' च्या (Bigg Boss 19) घरात रोज एक नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. मालती चहरची घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून रोज भांडणे होताना पाहायला मिळत आहे. मालती घरातील प्रत्येक सदस्याशी भांडताना दिसत आहे. मात्र आता तिने सर्व हद्द पार केल्या आहेत. ती घरात नेहलला खूप वाईट विधान बोलते त्यामुळे मालतीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे.

नुकताच घरात रेशन टास्क पार पडला आहे. मालती चहरने (Malti Chahar ) रेशन टास्क दरम्यान केलेल्या चुकीमुळे बिग बॉसने घरातील रेशन कापले. बिग बॉसने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये सर्वजण किचन एरियात पाहिला मिळतात. कुनिका सर्वांसाठी रव्याचा हलवा बनवत असते. तेव्हा नेहल, बसीर अली आणि मालतीमध्ये मोठे भांडण होते.

नेहल ( Nehal Chudasama) बोलते की, "रव्याचा हलवा बनत आहे. या निर्णयावर कोणी प्रश्न करायचा नाही." त्यानंतर मालती हसायला लागते. तेव्हा बसीर अली आणि मालतीमध्ये वाद होतात. तेव्हा पुन्हा नेहल बोलते की, "कुठूनही येतात आणि लोकांना विचारतात की तुम्ही आयुष्यात केले काय आहे? तु काय केले आहेस आयुष्यात?" तेव्हा मालती उत्तर देत बोलते की, पुढच्या वेळी कपडे घालून माझ्याशी बोल...(नेक्स्ट टाइम कपड़े पहनकर बात करना मुझसे)" हे ऐकताच घरातील सर्व सदस्य मालतीवर धडकताना दिसतात. कुनिका आणि बसीरला मोठा धक्का बसतो.

मालती चहरच्या अश्लील विधानामुळे संपूर्ण घर अस्वस्थ झाले आहे. आता यावर बिग बॉस कोणती शिका करणार? घरात आणखी कोणता ड्रामा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच घडलेल्या प्रकारामुळे सलमान खान काय निर्णय देणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. यंदाचा 'वीकेंड का वार' चांगलाच जागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: काँग्रेस आमदाराला बलात्कार प्रकरणी अटक, लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध, धमकी अन् गर्भपात

Maharashtra Politics: माजी आमदार सपकाळांनंतर आणखी एक निष्ठावंत शिलेदाराने सोडली साथ, उद्धव ठाकरेंना पुन्हा एक धक्का

Maharashtra Live News Update : ठाकरे बंधूंच्या दौऱ्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये

Gajar Recipe: गाजरचा फक्त हलवा नाही, तर हे 5 पदार्थ आजच घरी ट्राय करा

महायुद्ध अटळ! छोटीशी ठिणगी उडवेल युद्धाचा भडका, भारतालाही बसणार फटका

SCROLL FOR NEXT